पाकिस्तानात लग्नाला हजेरी लावल्यानंतर शत्रुघ्न सिन्हांचे ट्विट; जोडप्याला आशीर्वाद; सोशल मीडियावर वाद

congress leader shatrughan sinha twitter after wedding reception pakistan
congress leader shatrughan sinha twitter after wedding reception pakistan

मुंबई : काँग्रेस नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकतीच पाकिस्तानातील एका लग्नाला हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी ट्विट करत, नव्या जोडप्याला आशीर्वाद दिले आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांचा हा पाकिस्तान दौरा सोशल मीडियावर चर्चेला विषय ठरला होता. सोशल मीडियावरून टीका करणाऱ्यांना सिन्हा यांनी ट्विटवरून प्रत्युत्तर दिलंय. सिन्हा यांच्या या पाकिस्तान दौऱ्यावरून सोशल मीडियावर वाद सुरू झालाय. 

काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा पाकिस्तान दौऱ्यावर गेले होते. पाकिस्तानी उद्योगपती मिआन अस्साद अशान यांच्या मुलाच्या लग्नाला सिन्हा यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. सिन्हा यांनीही त्यांचे निमंत्रण अतिशय नम्रपणे स्वीकारले आणि विवाह सोहळ्याला हजेरी लावली. अशान यांचा मुलगा अहमदचं लग्न हिनाशी झालं. त्यांच्या रिसेप्शनला सिन्हा हजर होते. त्यांच्या या उपस्थितीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आणि त्यावरून सिन्हा यांना लक्ष्यही करण्यात आले. 

पाकिस्तानच्या अध्यक्षांशी चर्चा
शत्रूघ्न सिन्हांचा पाकिस्तान दौराच वादात सापडला. पाकिस्तानातील लग्नाला हजेरी लावण्यालाच अनेकांनी आक्षेप घेतला. त्याचवेळी पाकिस्तानच्या अध्यक्षांनी केलेल्या एका वक्तव्यावरून सिन्हा यांच्यावरील रोष आणखीनच वाढला. पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी यांनी सिन्हा यांच्याविषयी वक्तव्य करून, खळबळ उडवून दिली. सिन्हा यांनी 
आपल्याशी काश्मीरमधील लॉकडाऊनविषयी चर्चा केल्याचं अल्वी यांनी सांगितल्यानंतर भारतात शत्रूघ्न सिन्हा यांच्याविषयी संताप व्यक्त झाला.

काय आहे सिन्हांचे ट्विट?
पाकिस्तानातून परतल्यानंतर शत्रूघ्न सिन्हा यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पाकिस्तानातील माझे मित्र, मिआन अस्साद जे मला अगदी माझ्या कुटुंबासारखेच आहेत. त्यांच्या मुलाच्या लग्नाला मी हजेरी लावली होती. अहमद आणि हिनाचा हा लग्न सोहळ बहुचर्चित होता. माझ्या लाहोर आणि पाकिस्तानला भेट देण्याचा उद्देश संपला. नव दाम्पत्याला दीर्घायुष्य लाभो. शुभेच्छा आणि आशीर्वाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com