esakal | जन्माला आल्यानंतर 'ती' रडली नाही तर चिडली; फोटो होतोय व्हायरल!
sakal

बोलून बातमी शोधा

Brazil-New-Born-BabyGirl

डॉक्टरांकडे रागाने पाहिल्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी तिची नाळ कापली, तेव्हा ती पहिल्यांदा रडली.

जन्माला आल्यानंतर 'ती' रडली नाही तर चिडली; फोटो होतोय व्हायरल!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

रिओ डी जानेरो : जन्माला येताना सगळेजण रडत येतात, असं आपण ऐकलं आहे, पाहिलं आहे. मात्र, जन्माला आल्यानंतर कोणी चिडल्याचं आपल्या पाहण्यात किंवा ऐकण्यात आलं नाही. पण एक मुलगी सध्या याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ब्राझीलच्या रिओ डी जानेरो शहरात अशी एक घटना घडली जी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. १३ फेब्रुवारीला एका लहान मुलीने जन्म घेतला आणि काही क्षणातच ती खूप फेमस झाली आहे. ती इतकी फेमस होण्याचं कारण ऐकाल तर तुम्हाला हसावं की रडावं हे समजणार नाही. कारण जन्माला आल्यानंतर ती डॉक्टरांकडे रागाने पाहत होती. तिचा हा फोटो कॅमेरात कैद झाला असून तिचा हा फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे. 

- डोनाल्ड ट्रम्प यांचा 'भक्त' तुम्ही पाहिला का? उभारलयं ट्रम्प यांचं मंदिर!

जन्म झाल्यानंतर डॉक्टरांनी जेव्हा तिची नाळ (Umbilical Cord) कापण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती डॉक्टरांकडे रागाने बघू लागली. त्यामुळे काही वेळ डॉक्टरही अचंबित झाले होते. तिचा जन्म झाल्यावर ती कसलीही रडली नाही. जन्म झालेलं बाळ स्वस्थ आहे आणि त्याला संवेदना आहेत का? हे तपासण्यासाठी बाळाचं रडणं महत्त्वाचं असतं. तेच डॉक्टरांना चेक करायचे होते. त्यामुळे डॉक्टर तिला रडविण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हा ती डॉक्टरांकडे रागाने पाहू लागल्याची माहिती मिळाली आहे. 

- Video : 'बाहुबली' ट्रम्प यांनाही आवरला नाही व्हिडिओ शेअर करण्याचा मोह!

'डेली मेल' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मुलीची आई डायने डी जिसस बारबोसा यांनी बाळाच्या जन्माच्या आठवणी कायम लक्षात राहतील, यासाठी एक फोटोग्राफर नेमला होता. त्याच फोटोग्राफरने या छोट्या मुलीचा फोटो आपल्या फेसबुक अकाउंटवरून शेअर केले आहेत.  

- ट्रम्प भारतात आल्यानंतर मोदींचा 'तो' फोटो व्हायरल 

डॉक्टरांकडे रागाने पाहिल्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी तिची नाळ कापली, तेव्हा ती पहिल्यांदा रडली. तिचा जन्म २० फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती, पण या मुलीचा जन्म सात दिवस अगोदरच सिजेरिअन डिलिव्हरीनुसार झाला. जन्मानंतर काही वेळातच जगभर फेमस झालेल्या या मुलीचे नाव इसाबेल परेरा डी जिसस असे ठेवण्यात आल्याची माहितीही या फोटोग्राफने दिली.