Crime News : इंस्टाग्रामवर मैत्री, हॉटेलमध्ये भेट! काँग्रेस नेत्याचा मुलगा हनीट्रॅपमध्ये कसा अडकला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Crime News : इंस्टाग्रामवर मैत्री, हॉटेलमध्ये भेट! काँग्रेस नेत्याचा मुलगा हनीट्रॅपमध्ये कसा अडकला?

Crime News : मध्य प्रदेशातील काँग्रेस नेत्याचा मुलगा हनीट्रॅपमध्ये अडकला आहे. काँग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या मुलाला १२ लाख रुपयांनी ठगवण्यात आले. काँग्रेस नेत्याच्या मुलाची इंस्टाग्रामवर एका  तरुणीशी ओळख झाली होती. यानंतर तरुणीने त्याला हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. त्यानंतर तरुणीने मुलाचा व्हिडिओ बनवला आणि त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली.

तरुणीने तिच्या सहकाऱ्यांच्या मदतीने नेत्याच्या मुलाला जाळ्यात अडकवले होते. तरुणीने जास्त पैशांची मागणी केल्याने मुलाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास विजय नगर पोलीस करत आहेत.

हेही वाचा: मविआमध्ये सामील होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठ विधान; म्हणाले, लवकरच...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्जैनमधील काँग्रेसचे माजी नगरसेवक महेश टाटावत यांचा मुलगा हनी ट्रॅपचा बळी ठरला आहे. महेश याची ४ वर्षापूर्वी इन्स्टाग्रामवर एका तरुणीशी मैत्री झाली होती. त्यानंतर तरुणीने महेशला हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावून फसवणूक करून व्हिडिओ बनवला. त्यानंतर महेशला बलात्काराच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा: Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे शिवसेना कार्याध्यक्षपद सोडणार? निवडणूक आयोगाने...

महेशने सांगितले की त्याने आतापर्यंत तरुणीला १२ लाख रुपये दिले आहेत. मात्र आता तरुणीची पैशांची अपेक्षा वाढली आहे. त्यामुळे त्याने ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विरोधात वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. 

हेही वाचा: Pune : छत्रपती संभाजी महाराजांची ओळख 'धर्मवीर'च; अजितदादांच्या वक्तव्याचा शिवेंद्रराजेंनी घेतला समाचार

या सर्व प्रकरणाला कंटाळून महेशने आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला होता. महेश चार वर्षांपासून ब्लॅकमेलिंगचा सामना करत आहे. यामधे त्याने वडिलोपार्जित जमीनही तरुणीला पैसे देण्यासाठी विकली. 

हेही वाचा: Pune News : पंतप्रधान मोदींनी याकडे...; आमदार राजा भैय्यांचं हिंदू जन आक्रोश मोर्चात आवाहन

टॅग्स :Madhya Pradeshcrime