esakal | काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध?; खासदार राजीव सातव यांचे ट्विट चर्चेत

बोलून बातमी शोधा

congress leaders meeting mp rajeev satav twitter reaction

गुरुवारी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची व्हिडिओ काँन्फरन्सिंगद्वारे बैठक बोलवली होती. जवळपास चाडे चार तास चाललेल्या त्या बैठकीत नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध?; खासदार राजीव सातव यांचे ट्विट चर्चेत
sakal_logo
By
रविराज गायकवाड

नवी दिल्ली : ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट पक्षातून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसचे राज्यसभा सदस्य राजीव सातव यांनी पक्षाला आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. काँग्रेसमध्ये सध्या ज्येष्ठ नेते विरुद्ध तरुण नेते, अशी दुफळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यापार्श्वभूमीवर राजीव सातव यांचे ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

आणखी वाचा - वादळी बैठकीनंतर काँग्रेस नेते डॉ. मनमोहनसिंग यांच्या पाठिशी

काय आहे पार्श्वभूमी?
गुरुवारी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची व्हिडिओ काँन्फरन्सिंगद्वारे बैठक बोलवली होती. जवळपास चाडे चार तास चाललेल्या त्या बैठकीत नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बैठकीत राजीव सातव यांनी पक्षाच्या 2014पासूनच्या पराभवांचे विश्लेषण करण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले होते. बैठकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनिष तिवारी यांनी एक ट्विट करून, डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारला दोषी ठरविणाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. शशी थरूर आणि मिलिंद देवरा यांनीदेखील तिवारी यांना पाठिंबा देत, ट्विट करून, डॉ. मनमोहनसिंग यांच्यावरील टीका चुकीची असल्याचे मत व्यक्त केले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राजीव सातव यांचे एक शायरीचे ट्विट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहे. 

दरम्यान, माध्यमांनी आपल्या ट्विटचा चुकीचा अर्थ लावल्याचं म्हटलंय. पक्षातील विषय सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर आणणाऱ्यांपैकी मी नाही, असंही सातव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. डॉ. मनमोहनसिंग यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचंही सातव यांनी कौतुक केलंय.

'ट्विट-ट्विट खेळू नका'
काँग्रेस पक्षानेही सातव यांच्या ट्विटची गंभीर दखल घेतली आहे. पक्षाच्या पत्रकार परिषदेत प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटवर भाष्य केले. ते म्हणाले, 'पक्षातील माझ्या सहकाऱ्यांनी ट्विट-ट्विट खेळू नये. एकत्र येऊन मोदी सरकारच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे.

देशभरातील इतर घडामोडींसाठी येथे क्लिक करा

काय म्हणाले होते राजीव सातव?
राजीव सातव यांनी यूपीए सरकारमधली मंत्र्यांना आत्मपरिक्षणाचा सल्ला दिला आहे, असे वृत्त एनडीटीव्ही इंडियाने प्रसिद्ध केले आहे. त्यांचा रोख कपिल सिब्बल आणि पी. चिदंबरम यांच्यावर होता. सातव म्हणाले,'तुम्ही सगळेच म्हणत आहात की आपल्याला आत्मपरिक्षणाची गरज आहे. पण, आत्मपरिक्षणाची सुरुवात घरातून करा. 2009मध्ये काँग्रेसच्या 200च्यावर जागा होत्या. पण, 2014मध्ये आपण 44 संख्येवर आलो. तुम्ही त्यावेळी मंत्री होता. त्यामुळं तुम्हीदेखील हे पहायला हवे की, तुम्ही कुठं चुकलात?'