कॉंग्रेसला झटका; आमदाराचा राजीनामा 

कॉंग्रेसला झटका; आमदाराचा राजीनामा 

बंगळूर : कॉंग्रेसचे विजयनगर मतदारसंघाचे आमदार आनंद सिंह यांनी आज आमदारकीचा राजीनामा देऊन कॉंग्रेसला धक्का दिला. राजीमान्याचे कारण समजू शकले नाही, मात्र आज सकाळी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याचे मान्य केले.

आनंद सिंह यांच्या राजीनाम्यानंतर कर्नाटक कॉंग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. आणखी काही आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे सूत्राने म्हटले आहे. त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती, मात्र त्यांना मंत्री न केल्याने ते नाराज होते. 

विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी अद्याप राजीनाम्याची पुष्टी दिली नाही. यावर आनंद सिंह यांनी आपण पुन्हा राजीनामा देऊ, असे स्पष्ट केले. विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा मिळाला नसल्याचे म्हटले आहे. आपल्याकडे कोणाचाही राजीनामा आला नसून, कोणी आपली भेटही घेतली नसल्याचे कुमार यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com