मालेगाव : अजितदादांचा काँग्रेसला दणका, 28 नगरसेवक राष्ट्रवादीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अजितदादांचा काँग्रेसला दणका, 28 नगरसेवक राष्ट्रवादीत
अजितदादांचा काँग्रेसला दणका, आमदारासह 28 नगरसेवक राष्ट्रवादीत

अजितदादांचा काँग्रेसला दणका, 28 नगरसेवक राष्ट्रवादीत

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) यांच्या उपस्थित मालेगावमधील काँग्रेसचे (Congress) माजी आमदार आणि नगरसेवक अशा एकूण 27 जणांनी राष्ट्रवादीमध्ये (NCP) प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आह. यामध्ये माजी आमदार रशीद शेख शफी, काँग्रेसचे 27 आणि एमआयएमच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. राज्यात काँग्रेसचा सफाया झाला होता, तरी मालेगावमध्ये आम्ही काँग्रेस टिकवली होती. पण आता काँग्रेला आमची गरज नाही, आम्हाला कोणी बघत नाही, कोणी विचारत नाही. विलासराव देशमुख आमच्याकडे लक्ष देत होते. मात्र आता कोणीच बघत नाही. नाना पटोलेंनी दोन वेळा वेळ दिली आणि ते आले नाहीत. या गोष्टींमुळे आम्ही पक्ष सोडत असल्याचं रशीद शेख शफी यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा: '10 दिवसांत शरण या नाहीतर..' नितेश राणेंचा जामीन पुन्हा फेटाळला

अजित पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, हा प्रवेश कार्यक्रम मालेगावला मोठा करायचा होता मात्र, कोरोना आला. नियम आहेत ते आपणच कसे तोडायचे, त्यामुळं इथे कार्यक्रम करायचं ठरलं. येणाऱ्या काळात मालेगावला चांगला निधी देण्याचा प्रयत्न करू असंही ते यावेळी म्हणाले. तसंच तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करतात त्याबद्दल तुमचे आभार, पण तुमच्या कृतीतुन राष्ट्रवादीला कमीपणा होऊ देऊ नका. तुमच्या वरती आगीतून फुपाट्यात आल्याची वेळ आम्ही येऊ देणार नाही. महापालिकेला निधी द्यायचा आमचा प्रयत्न असतो.

हेही वाचा: सरनाईकांविरोधात सोमय्या आक्रमक, पोलिसांत करणार तक्रार

दरम्यान, महापौर ताहेरा शेख रशीद यांनीही पक्ष आम्हाला विचारत नाही, आमच्याकडे लक्ष देत नाही, म्हणून आम्ही पक्षाला सोडचिठ्ठी दिली असल्याचं सांगितलंय.

Web Title: Congress Mla Mayor And 28 Corporators Join Ncp In Presence Of Dcm Ajit Pawar Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CongressNCP