मला खोटं सांगून विमानातून उतरवलं, पवन खेरांच्या आरोपानंतर इंडिगोची प्रतिक्रिया; म्हटलं....

Pawan Khera
Pawan Khera sakal

नवी दिल्ली - काँग्रेस नेते पवन खेरा यांना दिल्ली विमानतळावर छत्तीसगडला जाण्यापासून रोखल्याने वाद निर्माण झाला आहे. आसाम पोलिसांच्या विनंतीवरून विमानाने उड्डाण करण्यापूर्वीच खेरा उतरले होते, असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. तर खेरा यांनी आपल्याला खोटं बोलून उतरवल्याचं म्हटलं. यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली असतानाच विमान कंपनी इंडिगोनेही या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

Pawan Khera
Video : कारागृहात सुकेशच्या सेलवर छापा; सापडली लाखोंची चप्पल, 80 हजारांची जीन्स अन् बरंच, मग…

इंडिगोने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीहून रायपूरला जाणाऱ्या विमानातून एका प्रवाशाला उतरवण्यात आले. तसेच आणखी काही प्रवाशांना त्यांच्या मर्जीने उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार काम करत आहोत.

Pawan Khera
Pawan Khera : काँग्रेस नेते पवन खेरांना मोठा दिलासा, SC कडून अंतरिम जामीन मंजूर

काँग्रेसचे मीडिया विभागप्रमुख पवन खेरा यांना गुरुवारी रायपूरला जाणाऱ्या विमानातून उतरवण्यात आले. दिल्ली पोलिसांनी त्यांना धावपट्टीवरून ताब्यात घेतले. दिल्ली विमानतळावर उपस्थित असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, खेरा यांच्याविरोधात आसाममध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून दिल्ली पोलिसांनी खेरा यांना धावपट्टीवरून आपल्यासोबत नेले आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचा ताबा आसाम पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com