Shashi Tharoor काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर सर्वात आधी काय करणार? शशी थरूर म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shashi-Throor

Shashi Tharoor काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर सर्वात आधी काय करणार? शशी थरूर म्हणाले...

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्रचारात व्यस्त असणारे काँग्रेसनेते शशी थररू यांनी अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर सर्वात आधी कोणतं काम करणार याविषयी सांगितलं आहे. थरूर यांच्यासमोर ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खडगे यांचे आव्हान आहे.

हेही वाचा: छत्तीसगड विधानसभा उपाध्यक्ष मंडावी यांचे निधन; अनेक नेत्यांकडून शोक व्यक्त

शशी थरूर म्हणाले की, अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर सर्वातआधी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेस नेत्यांना थांबवू. काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खडगे हे देखील माझेच नेते आहेत. आम्ही शत्रू नाही. मी प्रक्रियेत बदल करण्यासाठीचा उम्मेदवार आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मी जिंको वा खडगे जिंको मला काही फरक पडणार नाही, असंही थरूर यांनी नमूद केलं.

थरूर पुढं म्हणाले की, ज्या लोकांनी माझे समर्थन केले, ते बंडखोर नाहीत किंवा गांधी परिवाराच्या विरोधातही नाही. गांधी परिवार हे नेहमी काँग्रेससोबत आहे.

हेही वाचा: Nirmala Sitharaman: रुपया कमजोर होत नसून डॉलर मजबूत होतोय; सीतारामन यांचं अजब विधान

थरूर यांनी याआधी म्हटलं होतं की, ज्या लोकांना बदल हवाय त्यांनी मला जिंकून द्यावं. ज्यांना वाटतं की पक्षात सर्वकाही ठीक आहे, त्यांनी मला निवडून देऊ नये. त्यांनी हे देखील म्हटलं की, जे मतदार २०१४ आणि २०१९ मध्ये दूर गेले त्यांनी देखील पुन्हा पक्षाजवळ यावे. मला काँग्रेस पार्टीमध्ये बदल करायचा असल्याचं त्यांनी नमूद केलं.

यावेळी थरूर यांनी पक्षातील पक्षपातावर भाष्य करताना म्हटलं की, मोठे नेते माझ्यापासून दुर जाताना तरुण कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत. मात्र मी जिथे जातो, तिथे सामान्य लोकं माझ्या सोबत असतात.