esakal | सोनिया गांधींची तब्येत बिघडलीय? दिल्लीतून बाहेर राहण्याचा डॉक्टरांचा सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

Sonia-Gandhi

दिल्लीमध्ये वायु प्रदुषणाची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. दरम्यान, कोरोनाचा उद्रेकही झाला असून तिसऱ्या लाटेचा सामना दिल्लीकर करत आहेत.  यातच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना डॉक्टरांनी काही दिवस दिल्लीतून बाहेरच राहण्याचा सल्ला दिला असल्याचं समजते. पक्षाच्या सूत्रांनी शुक्रवारी याबाबतची माहिती दिली आहे.

सोनिया गांधींची तब्येत बिघडलीय? दिल्लीतून बाहेर राहण्याचा डॉक्टरांचा सल्ला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये वायु प्रदुषणाची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. दरम्यान, कोरोनाचा उद्रेकही झाला असून तिसऱ्या लाटेचा सामना दिल्लीकर करत आहेत. यातच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना डॉक्टरांनी काही दिवस दिल्लीतून बाहेरच राहण्याचा सल्ला दिला असल्याचं समजते. पक्षाच्या सूत्रांनी शुक्रवारी याबाबतची माहिती दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संसदेच्या पावसाळी अधिवेशनावेळीच सोनिया गांधी उपचारासाठी परदेशात गेल्या होत्या. त्यावेळी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हेसुद्धा त्यांच्यासोबत होते. त्याआधी ऑगस्ट महिन्यात सोनिया गांधींना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता दिल्लीतील बिघडलेल्या वातावरणात राहणं त्यांच्या तब्येतीला धोक्याचं ठरू शकतं यासाठी विशेष काळजी घेतली जात असल्याचं म्हटलं जात आहे. 

''लव्ह जिहादच्या शब्दांतून भाजप रचतोय देश तोडण्याचा डाव"

दिल्लीत वायु प्रदूषणामुळे सोनिया गांधींचा अस्थमा वाढला आहे आणि डॉक्टरांनी त्यांना काही दिवस दिल्लीतून बाहेर राहण्याचा सल्ला दिल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे. सोनिया गांधी अशा वेळी दिल्लीतून बाहेर आहेत थांबत आहेत जेव्हा बिहारमध्ये काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे. आता पक्षातील नेतेही काँग्रेसनं विचार करायला हवा असं म्हणत आहेत. 

Corona Vaccine: 'ऑक्सफर्डची लस एप्रिलमध्ये, दोन डोसची किंमत असणार 1000 रुपये'

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी  30 जुलैला सर गंगाराम रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्याठिकाणी काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज दिला होता. सप्टेंबर महिन्यात त्या नियमित वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात गेल्या होत्या. यामुळे त्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सदनांच्या कामकाजात भाग घेऊ शकल्या नव्हत्या.