esakal | Corona Vaccine: 'ऑक्सफर्डची लस एप्रिलमध्ये, दोन डोसची किंमत असणार 1000 रुपये'
sakal

बोलून बातमी शोधा

vaccine

सामान्य नागरिकांसाठी लसीच्या दोन डोसची किम्मत एक हजार रुपये असणार असल्याची माहितीही पुनावाला यांनी दिली आहे

Corona Vaccine: 'ऑक्सफर्डची लस एप्रिलमध्ये, दोन डोसची किंमत असणार 1000 रुपये'

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: भारतात कोरोनावरील लस बनवत असलेली कंपनी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी कोरोनावरील लस पुढील वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत येईल असं सांगितले आहे. सुरुवातीला ही लस आरोग्य कर्मचारी आणि वृध्दांना देण्यात येणार आहे.

सामान्य नागरिकांसाठी लसीच्या दोन डोसची किम्मत एक हजार रुपये असणार असल्याची माहितीही पुनावाला यांनी दिली आहे. पण हे शेवटच्या चाचण्या आणि नियामक संस्थांच्या मंजुरीवर अवलंबून असणार आहे. तसेच 2024 पर्यंत प्रत्येक भारतीयाला कोरोनाची लस दिली गेलेली असेल आणि भारतातील प्रत्येक व्यक्तीला लस द्यायला दोन-तीन वर्षे लागतील,अशी माहितीही आदर पुनावाला यांनी दिली.

Corona Updates: देशातील बाधितांचा आकडा 90 लाखांच्या वर

दिवाळीनंतर कोरोनाचा प्रसार देशात वाढताना दिसत आहे. मागील 24 तासांत कोरोनाचे 45 हजार 882 रुग्ण आढळले असून 584 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशातील कोरोना बाधितांची संख्या 90 लाखांच्या वर गेली आहे. मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची प्रतिदिन रुग्णवाढ 30 हजारांच्या खाली आली होती. पण आता रुग्णवाढीने मोठा वेग पकडला आहे. 

आतापर्यंत देशात कोरोनाच्या एकूण 90 लाख 4 हजार 366 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर एकूण मृत्यूंचा आकडा 1 लाख 32 हजार 162 वर गेला आहे. सध्या देशभरात कोरोनाचे  4 लाख 43 हजार 794 रुग्ण उपचार घेत आहेत. मागील 24 तासांत सक्रिय रुग्णांची संख्या 491 ने कमी झाली आहे. 

औषध निर्माती फायजर कंपनीने कोरोनावरील लशीच्या अंतिम टप्प्यातील चाचणीचे 95 टक्के निकाल सकारात्मक आल्याचा दावा केला आहे. लवकरच लशीच्या मंजुरीसाठी एक-दोन दिवसांत अर्ज करणार असल्याची माहितीही कंपनीने दिली आहे. 

अंतिम विश्लेषणाच्या काही दिवस आधी फार्मास्युटिकल औषध कंपनी फायजरने म्हटले होते की, लशीच्या विश्लेषणावरुन समजते की ही लस कोविड-19 रोखण्यात 90 टक्केपर्यंत प्रभावी ठरु शकते. यावरुन लशीचे परीक्षण व्यवस्थित सुरु असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, या लशीवरुन अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी फायजर कंपनीचे अभिनंदन केले होते.