esakal | राजस्थानात काँग्रेसची बालमृत्यूंमुळे कोंडी
sakal

बोलून बातमी शोधा

Congress

कोटा (राजस्थान) येथील सरकारी रुग्णालयात बालमृत्यूचा आकडा शंभरावर पोहोचल्याने राजकारण तापले आहे. शासकीय हलगर्जीपणामुळे बालके दगावल्याची माहिती पुढे येत असून, सत्ताधारी काँग्रेसची कोंडी वाढली आहे. यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे.

राजस्थानात काँग्रेसची बालमृत्यूंमुळे कोंडी

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली - कोटा (राजस्थान) येथील सरकारी रुग्णालयात बालमृत्यूचा आकडा शंभरावर पोहोचल्याने राजकारण तापले आहे. शासकीय हलगर्जीपणामुळे बालके दगावल्याची माहिती पुढे येत असून, सत्ताधारी काँग्रेसची कोंडी वाढली आहे. यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोटा येथे बालमृत्यूंची वाढलेली संख्या आणि राज्याचे आरोग्यमंत्री रघू शर्मा यांच्या वक्तव्यामुळे वाद वाढला आहे. भाजपने या मुद्द्यावर राहुल गांधी आणि प्रियांका गांधींच्या दुर्लक्षावर प्रश्‍न उपस्थित केला आहे.

कॉन्व्हेंटमध्ये शिकून मुले गोमांस खातात; केंद्रिय मंत्र्यांचे विधान

या प्रकारामुळे अस्वस्थ झालेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी आज राजस्थानचे प्रभारी सरचिटणीस अविनाश पांडे यांना तातडीने बोलावून या प्रकरणाची माहिती घेतली. तसेच, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून खुलासा मागवताना यावर आधीच उपाययोजना का नाही झाल्या, अशा शब्दांत विचारण केल्याचे समजते.

लोकपालाच्या नावाखाली कोट्यवधींचा भुर्दंड

असंवेदनशीलतेची टीका
अशोक गेहलोत यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना कोटा येथील रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी निमंत्रण दिले. तसेच, यावेळचे बालमृत्यूचे आकडे मागील पाच वर्षांत सर्वांत कमी असून भाजपकडून होणारी टीका ही नागरिकत्व कायदा, एनआरसीला होणाऱ्या विरोधावरील लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी आहे, असा दावा केला. यामुळे सरकावर असंवेदनशीलतेची टीका सुरू झाली.