
संजय राऊतांच्या समर्थनार्थ राहुल गांधींचे ट्वीट, म्हणाले...
नवी दिल्ली : पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली असून त्याना 4 ऑक्टोबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. या दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत संजय राऊत यांचे समर्थन केले आहे. तसेच आपल्या या ट्विटमध्ये राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आणि म्हटले की, राजाचा यांचा स्पष्ट संदेश आहे, जो कोणी माझ्याविरोधात बोलेल, त्याला त्रास होईल.
सक्तवसुली संचालनालयाने संजय राऊत यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. संजय राऊत यांना आज न्यायालयाने 4 दिवसांची ईडी कोठडीत पाठवले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांना 16 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटक केली असून संजय राऊत यांच्या अटकेवरून विरोधकांकडून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. हे सूडाचे राजकारण म्हटले जात आहे. दरम्यान या सगळ्यात आता राहुल गांधींनीही शिवसेना नेते संजय राऊत यांना पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत संजय राऊत यांचे समर्थन केले आहे.
आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधींनी लिहिले की, 'राजा'चा संदेश स्पष्ट आहे - जो माझ्याविरोधात बोलेल त्याला त्रास होईल. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे आणि सत्य झाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण हुकुमशाने लक्षात ठेवावं, शेवटी 'सत्या'चाच विजय होतो आणि अहंकार हरतो. इतरही नेत्यांना संजय राऊत यांच्या अटकेनंतर मोदी सरकरावर टीका करत आहेत.