Rahul Gandhi : धक्कादायक! भारताच्या निवडणुकीत इस्रायली कंपनीचा वापर; काँग्रेसची चौकशीची मागणी

Rahul Gandhi and Narendra Modi
Rahul Gandhi and Narendra Modi

नवी दिल्ली - भारताच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्यासाठी इस्रायली कंपनीच्या कथित वापराची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने गुरुवारी केली आहे. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते पवन खेरा आणि सुप्रिया श्रीनेत यांनी इस्रायली युनिट 'टीम जॉर्ज' आणि भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचा संदर्भ देत देशातील मतदारांना प्रभावित करण्यासाठी खोटा प्रचार केल्याचा दावा केला आहे. (congress seeks probe into alleged use of israeli firm in indian polls)

Rahul Gandhi and Narendra Modi
Girish Bapat : कसब्याचे 'किंगमेकर' बापट आजारपणातही मैदानात; म्हणाले, हेमंतला थोडं...

खोट्या 'बातम्या' पसरवल्या जात आहेत. तसेच भारतातील नागरिकांच्या डेटाशीही तडजोड केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. खेडा यांनी दावा केला की, “भारतातील सत्ताधारी पक्षाकडूनच भारतातील लोकशाही धोक्यात आली आहे. देशाच्या लोकशाहीवर प्रभाव टाकण्यासाठी इस्रायलच्या एजन्सीची मदत घेतली जात आहे. भारतात बसून ते इतर देशांसोबत भारताच्या लोकशाहीविरुद्ध कट रचत आहेत.

Rahul Gandhi and Narendra Modi
ST पगारासाठी २२३ कोटी मंजूर; रखडलेला पगार 24 तासात होण्याची शक्यता

सुप्रिया श्रीनेत म्हणल्या की, इस्रायली कंपनी भारतासह ३० देशांच्या निवडणुकांमध्ये फेरफार करते, पण मोदी सरकार गप्प आहे, पेगाससवर मोदी सरकार काहीच बोलले नाही, पसरवण्यात येत असलेल्या खोट्या बातम्यांमध्ये भाजप आयटी सेल आणि त्यांच्या तथाकथित भागीदारांचा हात आहे. यावर सरकारने मौन सोडले पाहिजे, असा दावाही श्रीनित यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com