esakal | Video: बलात्काऱ्याला तिकीट देऊ नका म्हणणाऱ्या काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीला मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

Tara yadav Up

त्यांनी म्हटलंय की या घटनेबाबत प्रियंका गांधींनी काहीतरी कारवाई करण्याची मी वाट पाहत आहे. 

Video: बलात्काऱ्याला तिकीट देऊ नका म्हणणाऱ्या काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीला मारहाण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील काँग्रेसमध्ये एका महिला कार्यकर्तीला मारहाण केली गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशातील देवरिया या गावातील काँग्रेसच्या एका सभेत ही घटना घडली आहे. बलात्काराचे आरोप असणाऱ्या माणसाला पक्षाचे तिकीट कसे देऊ शकता अशी विचारणा केल्याबद्दल या महिला कार्यकर्तीला ही मारहाण करण्यात आली आहे. हाथरस प्रकरणानंतर संपूर्ण देश हादरला असताना अशा कारणासाठी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांकडून आपल्याच कार्यकर्तीला मारहाण झाल्याच्या या घटनेबद्दल संताप व्यक्त केला जातोय. या घटनेनंतर त्या महिला कार्यकर्तीचं वक्तव्य देखील समोर आलं आहे. त्यांनी म्हटलंय की या घटनेबाबत प्रियंका गांधींनी काहीतरी कारवाई करण्याची मी वाट पाहत आहे. 

हेही वाचा - Bihar Election : असाही एक चहावाला; हटके पद्धतीने मतदानाविषयी करतोय जागृती

तारा यादव असं या कार्यकर्तीचं नाव आहे. या घटनेनंतर त्या म्हणाल्या की, जेव्हा बलात्काराचे आरोप असणाऱ्या मुकुंद भास्कर यांना येत्या पोटनिवडणुकीत तिकीट देण्याचा निर्णय झाला तेव्हा मी पक्षाच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला की एखाद्या  बलात्काऱ्याला पक्षाकडून तिकीट कसे दिले जाऊ शकते? माझ्या या प्रश्नावर उत्तर न देताच मला कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली.  पक्षाने चुकीच्या माणसाला तिकीट दिले आहे जे बलात्कारी आहेत. मी माझं हे मत सचिन नायक यांना सांगत होते. चुकीच्या व्यक्तीला तिकीट दिल्याने समाजात पक्षाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने जाऊ शकते. कुणा अशा व्यक्तीला तिकीट दिले जावे ज्याचे चरित्र चांगले असेल. हे मत मांडल्यानंतर तिथे मला मारहाण करण्यात आली आणि आता मी याप्रकरणी प्रियंका गांधी काहीतरी कारवाई करतील याची मी वाट पाहत आहे. 

या प्रकरणात लक्ष घालत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटलंय की, असे आजारी मानसिकतेचे सगळे लोक राजकारणात येतातच कसे? आम्ही याची दखल घेऊ. 

हेही वाचा - Bihar Election : काँग्रेसची स्टार प्रचारकांची यादी जाहीर ;बंडानंतर पहिल्यांदाच पायलटांवर मोठी जबाबदारी

गेल्या शुक्रवारी काँग्रेसने उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आपले उमेदवार जाहीर केले. उत्तर प्रदेशात पाच तर झारखंडमध्ये एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये डॉ. कमलेश सिंग यांना नौगवान सादत, सुशील चौधरी यांना बुलंदशहर, स्नेहलता यांना तुंदला, क्रिपाशंकर यांना घाटमपूर आणि मुकुंद भास्कर मनी त्रिपाठी यांना देवरियामधून पक्षाकडून तिकीट दिलेल आहे. कुमार जयमंगल हे बेरमाव, झारखंडचे उमेदवार आहेत.  

loading image