
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकारी समितीची शुक्रवारी बैठक बोलावण्यात आली होती. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात ही बैठक झाली. या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सीपीपी अध्यक्ष सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इतर काँग्रेस नेते उपस्थित होते. काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर त्यांच्या प्रतिष्ठेनुसार योग्य ठिकाणी अंत्यसंस्कार करावेत आणि स्मारकासाठी योग्य ठिकाण मिळावं अशी चर्चा झाली. याबाबत कुटुंबिय सरकारसोबत चर्चा करत आहे.