esakal | सलग आठव्या दिवशी देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा अमेरिका, ब्राझीलपेक्षाही अधिक
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19, corona

आतापर्यंत जगभरात 20,209,647 कोरोनाचे रुग्ण मिळाले असून त्यातील 7,40,276 लोकांचा मृत्यु झाला आहे. सध्या अमेरिकेत सगळ्यात जास्त सक्रीय रुग्ण असून त्यानंतर ब्राझील आणि भारत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.  

सलग आठव्या दिवशी देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा अमेरिका, ब्राझीलपेक्षाही अधिक

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

जगभरासह भारतात कोरोनाने चांगलेच थैमान घातले आहे. दररोज वाढणारा कोरोनाच्या रुग्णांचा आकडा सरकारची डोकेदुखी वाढवत आहे. काळजीत भर घालणारी बाब म्हणजे भारतात मंगळवारी कोरोनाचे तब्बल 60,963 नवीन रुग्ण सापडले आहेत. हा सलग आठवा दिवस आहे, जेंव्हा अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा ही वाढ अधिक आहे.  तसेच मागील 24 तासांत 834 लोकांचा कोरोनामुळे मृत्य झाला आहे. आतापर्यंत देशात एकूण 46,091 लोकांना प्राण गमवावे लागले असून  सध्या 6,43,948 सक्रीय रुग्ण आहेत. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे काल एका दिवसात 56,461 लोक बरे झाले आहेत. त्यामुळे रिकव्हरी रेट 70 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. 

शिक्षणातील नवा अध्याय

इकडे राज्यांचा विचार केला तर, कोरोनाचे सर्वाधिक महाराष्ट्रात 5,35,601 रुग्ण आहेत.  मंगळवारी महाराष्ट्रात कोरोनाचे नवीन 11,088 रुग्ण सापडले आहेत. यामुळे सध्या संक्रमितांची संख्या 5,35,601 झाली आहे. तर कोरोनामुळे काल एका दिवसात 256 लोकांचा मृत्यु झाला आहे. सध्या देशात 8 राज्ये अशी आहेत जिथं रुग्णांचा आकडा 1 लाखांच्या वर गेला आहे. यामध्ये  महाराष्ट्र आघाडीवर असून त्यानंतर तामिळनाडु, आंध्रप्रदेश, कर्नाटक, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो.

Russia Vaccine Update: रशियाच्या कोरोना लसीवर भारतालाही शंका

आतापर्यंत जगभरात  20,209,647 कोरोनाचे रुग्ण मिळाले असून त्यातील 7,40,276 लोकांचा मृत्यु झाला आहे. सध्या अमेरिकेत सगळ्यात जास्त सक्रीय रुग्ण असून त्यानंतर ब्राझील आणि भारत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. सध्या भारतातील परिस्थितीही दिवसेंदिवस वाईट होत आहे. आतापर्यंत भारतात कोरोनाचे  23,29,638 रुग्ण मिळाले आहेत. त्यामध्ये सध्या 6,43,948 सक्रीय रुग्ण असून 16,39,599 रुग्ण बरे झाले आहेत.  इंडियन मेडीकल असोसिएशनने(IMA)काही दिवसांपुर्वीच भारतात  कोरोनाचं 'कम्युनिटी ट्रांसमिशन' सुरू झाल्याचं सांगितलं होतं. IMAच्या नुसार, भारतात कोरोना खेड्यापर्यंत पोहचला आहे. पण हा IMA चा दावा सरकारने खोडून काढला आहे. सरकारच्या मते भारतात अजून कोरोनाचं 'कम्युनिटी ट्रांसमिशन' सुरू झालं नाही.
 

loading image