esakal | Russia Vaccine Update: रशियाच्या कोरोना लसीवर भारतालाही शंका
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19, vaccine, aiims delhi, russia

जागतिक आरोग्य संघटना, अमेरिका आणि जर्मनीसह अनेक जणांनी रशियाच्या दाव्यावर शंका उपस्थितीत केली आहे.  

Russia Vaccine Update: रशियाच्या कोरोना लसीवर भारतालाही शंका

sakal_logo
By
सुशांत जाधव

नवी दिल्ली : कोविड-19 वरील प्रभावी लस तयार करण्यात रशिया आघाडीवर असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या दाव्यानंतर जगभरातून यासंदर्भात प्रतिक्रिया उमटत आहेत. दिल्लीतील एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली. लस तयार झाली म्हणजे सर्वकाही नसते तर त्याची सुरक्षितता महत्वाची असते. त्याचे काही दुष्परिणाम (साइट इफेक्ट) जाणवतात का हे पाहावे लागते, असे गुलेरिया यांनी म्हटले आहे. त्यांनी रशियाच्या लसीवर थेट आक्षेप घेतला नसला तरी रशियाने ज्या पद्धतीने घोषणा केली त्यावरुन ही प्रतिक्रिया रशियाच्या दाव्यावर शंका उपस्थितीत करणारी अशीच ठरते.   

रशियाची कोरोनावरील लस भारताला मिळणार का?

जागतिक आरोग्य संघटना, अमेरिका आणि जर्मनीसह अनेक जणांनी रशियाच्या दाव्यावर शंका उपस्थितीत केली आहे. कोविड-19 लस निर्मितीसंदर्भातील आवश्यक माहिती देण्यास रशिया टाळाटाळ करत असल्याचे जागितक आरोग्य संघटनेने म्हटले होते. जगातील अनेक देश कोविड-19 लस तयार करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. भारतातही लसीची मानवी चाचणी सुरु आहे. रशियाच्या लसीसंदर्भात गुलेरिया म्हणाले की, रशियाची लस सुरक्षित आणि प्रभावी आहे का याची चाचपणी आवश्यक आहे. सुरक्षिततेचा अर्थ त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत याची खात्री व्हायला हवी. इम्युनिटी वाढवण्यात ती प्रभावी आहे का? हे देखील पाहावे लागेल.  भारताकडे लस तयार करण्याची क्षमता असून त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादनही शक्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हे वाचा - पहिली लस रशियाचीच; पुतीन यांची घोषणा, मुलीलाही दिली लस

जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 

जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 2 कोटींच्या घरात पोहचला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने महा साथीचा रोग म्हणून घोषीत केलेल्या कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे आतापर्यंत जगभरातील 7 लाखाहून अधिक लांकांनी आपला जीव गमावला आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढतानाचे चित्र आहे. देशातील परिस्थिती चिंताजनक असून 23 लाखहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. सध्याच्या घडीला कोरोनावर कोणतीही लस नाही. पण भारतासह अन्य देशातील शास्त्रज्ञ लवकरच यावरील लस उपलब्ध करुन देण्याचा विश्वास व्यक्त करत आहेत. दरम्यान रशियाने थेट लस तयार केल्याचा दावा करत यात आघाडी घेतल्याची वृत्ते झळकत आहेत.  

loading image
go to top