अनंतनागमध्ये ग्रेनेड हल्ला; 14 जखमी 

अनंतनागमध्ये ग्रेनेड हल्ला; 14 जखमी 

श्रीनगर : दक्षिण काश्‍मीरमधील अनंतनागमध्ये उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर दशतवाद्यांनी शनिवारी हातबॉंब फेकले. यामध्ये वाहतूक पोलिसासह 14 जण जखमी झाले. जम्मू-काश्‍मीरमधील 370 कलम 5 ऑगस्ट रोजी हटविल्यापासूनचा हा हातबॉंबचा दुसरा हल्ला आहे.

अनंतनाग शहरात उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते. तेथे गस्तीवर असलेल्या सुरक्षा पथकावर दहशतवाद्यांनी आज सकाळी 11 च्या सुमारास हातबॉंब फेकले, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

हातबॉंबचा निशाणा चुकला आणि रस्त्येच्या कडेला त्यांचा स्फोट झाला. यात एक वाहतूक पोलिस आणि पत्रकारासह 14 जण जखमी झाले. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी 13 जणांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. एकावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती धोक्‍याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. 

दरम्यान, या स्फोटामुळे शहरात घबराट निर्माण झाली. स्फोट झालेल्या परिसराचा ताबा सुरक्षा दलांनी घेतला असून, हल्ला करणाऱ्या दशतवाद्यांचा शोध सुरू आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही.

28 सप्टेंबरलाही झाला होता हल्ला

28 सप्टेंबरला दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील नावा कडाल भागात सुरक्षेसाठी तैनात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) 38 व्या तुकडीवर हातबॉंबचा हल्ला केला होता. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नव्हती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com