Vidhan Sabha 2016 : धनंजय मुंडेंना धक्का; आणखी एक मुंडे भाजपमध्ये 

प्रा. प्रवीण फुटके
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

परळी : मुंडे बहीण-भावात होत असलेली लढत रंगतदार बनत असून, आता फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. ऐन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना धक्का बसला आहे.

परळी : मुंडे बहीण-भावात होत असलेली लढत रंगतदार बनत असून, आता फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. ऐन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना धक्का बसला आहे.

धनंजय मुंडेंना केली होती मदत
काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा. टी. पी. मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भाजप प्रवेश केला. प्रा. मुंडे यांनी 2009 आणि 2014 मध्ये पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. आघाडीमध्ये  परळीची जागा काँग्रेसची होती. मात्र, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यामुळे राहतवाडीने ही जागा आपल्याकडे घेतली. जिल्ह्यात सध्या काँग्रेस एकही जागा लढवीत नाही. दरम्यान, परळीत धनंजय मुंडे यांनी काका दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या विरोधात बंड करून, नगर पालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आणली तेव्हा टी. पी. मुंडे यांनीही काँग्रेस सदस्य त्यांना मदतीला दिले होते. 

रितेश देशमुखने गाजवली लातूरची सभा

युवक काँग्रेसची 'वेक अप महाराष्ट्र'ची घोषणा

सर्वांत लक्षवेधी निवडणूक
जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्ह्यात फक्त परळी मतदार संघातच काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी झाली होती. तेव्हा जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीचे मुंडे यांच्या मुलाला  उपाध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली होती. दरम्यान, गुरुवारी पंकजा मुंडे यांनी भाजप तर, धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केले. दोघांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन केले. आता फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. राज्यातील सर्वांत हायप्रोफाईल आणि लक्षवेधी निवडणूक म्हणून परळीच्या निवडणुकीकडं पाहिलं जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2016 congress leader t p munde joins bjp beed dhananjay munde