दिलासादायक बातमी; 'कोरोना रिकव्हरी रेट' भारतात सर्वाधिक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

देशातील कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याचा दर हा पूर्वीपेक्षा अधिक वाढला आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहिर केलेल्या माहितीनुसार गेल्या चोविस तासांमध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येपेक्षा कमी आहे. 

सध्या भारतात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. जगात अमेरिकेनंतर कोरोनाग्रस्त रुग्णांची सर्वाधिक संख्या ही भारतातच आहे. असं असलं तरीही त्यातल्या त्यात एक सकारात्मक बाब निदर्शनास आली आहे. देशातील कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याचा दर हा पूर्वीपेक्षा अधिक वाढला आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहिर केलेल्या माहितीनुसार गेल्या चोविस तासांमध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येपेक्षा कमी आहे. 

हेही वाचा - मोदी सरकारची चिंता वाढली, एकूण कर्ज पोहोचलं 101.3 लाख कोटी रुपयांवर

भारतात कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याचा दर हा अमेरिकेहून अधिक झाला आहे. सध्या जगभरात तो प्रथम क्रमांकावर आहे. गेल्या चोविस तासात देशात ९५ हजार ८८५ रूग्ण करोनामुक्त झाले आहे. तर दुसरीकडे ९३ हजार ३३७ करोनाबाधितांची नोंद झाली आहे. या आकडेवारीनुसार ही संख्या करोनामुक्त झालेल्या रुग्णांपेक्षा कमी आहे.

आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतात रुग्ण बरे होण्याचा दर अर्थात रिकव्हरी रेट हा 79.28 टक्क्यांवर पोहोचला आहे. एकूण आकडेवारीकडे नजर टाकली असता, आजवर देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 53 लाखांहून अधिक झाली आहे. त्यापैकी 42 लाख रुग्ण कोरोनापासून मुक्त झाले आहेत. जगातील एकूण रुग्णसंख्येच्या 17 टक्के रुग्ण हे एकट्या भारतात आहेत. परंतु, अशातच रिकव्हरी रेट वाढल्याची माहिती मिळाल्याने दिलासादायक वाटत असल्याची भावना आहे. या साऱ्याचे श्रेय केंद्र सरकारचे असून योग्य रणनीती, ठोस उपाययोजना, कडक अंमलबजावणी, आणि योग्यवेळी उचललेली योग्य पावले यामुळे हे शक्य झाल्याचे आरोग्यमंत्रालयाने म्हटले आहे. 

हेही वाचा -  देशात 11 दिवसांत 10 लाख नवे रुग्ण; रिकव्हरी रेट दिलासादायक

फक्त सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 16 लाख 86 हजार 769 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 21 हजार 150 रुग्ण मरण पावले आहेत. सध्या देशातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या 19.10 टक्के आहे. देशातील कोरोनाचा मृत्यूदर 1.61 टक्के आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona good news India become first in corona recovery rate