Corona Update India: देशात कोरानाचा आलेख वाढताच... गेल्या 24 तासात सक्रिय रुग्ण अन् मृत्यूमध्ये देखील वाढ

जानेवारी 2020 मध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून भारतात कोरोनाव्हायरसच्या एकूण रुग्णांची संख्या 4,50,10,944 वर पोहोचली आहे. भारतातील कोविड-19 प्रकरणांमुळे एकूण मृतांची संख्या 5,33,346 वर पोहोचली आहे.
corona update
corona updatesakal

Corona Update India:   भारतात गेल्या 24 तासांत कोविड-19 चे 692 नवीन रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 4,097 वर पोहोचली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात सहा मृत्यूची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात दोन आणि दिल्ली, कर्नाटक, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक मृत्यूची नोंद झाली आहे.

जानेवारी 2020 मध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून भारतात कोरोनाव्हायरसच्या एकूण रुग्णांची संख्या 4,50,10,944 वर पोहोचली आहे. भारतातील कोविड-19 प्रकरणांमुळे एकूण मृतांची संख्या 5,33,346 वर पोहोचली आहे. जी गेल्या 24 तासांत सहा मृत्यूंची वाढ दर्शवते.

बुधवारी, दिल्लीत कोविड-19 उप-प्रकार JN.1 चे पहिले प्रकरण नोंदवले.

"दिल्लीत Omicron चे सब-व्हेरियंट JN.1 चे पहिले प्रकरण नोंदवले गेले आहे. जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवलेल्या तीन नमुन्यांपैकी एक JN.1 आहे आणि दोन Omicron आहेत," असे दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांनी सांगितले. (Corona Update)

corona update
Priyanka Gandhi: प्रियांका गांधींच्या अडचणी वाढणार! आर्थिक घोटाळ्याच्या चार्जशीटमध्ये ईडीनं दाखल केलं नाव

उल्लेखनीय म्हणजे, JN.1 उप-प्रकार हे BA.2.86 किंवा पिरोला म्हणून ओळखल्या जाणार्‍या ओमिक्रॉन सबव्हेरियंटचा प्रकार आहे. केरळमध्ये कोरोना च्या JN.1 प्रकाराची पहिली केस नोंदवली गेली. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारपर्यंत भारतात JN.1 उप-प्रकारची एकूण 109 प्रकरणे आढळून आली आहेत. सध्याच्या परिस्थितीवरुन JN.1 द्वारे धोका कमी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ने कोविड-19 संशयित किंवा सकारात्मक रुग्णांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. एम्स दिल्लीच्या संचालकांनी बुधवारी कोविड-19 आकस्मिक उपायांबाबत रुग्णालयाच्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. बैठकीत, कोविड-19 चाचणी बाबत धोरणे, पॉझिटिव्ह रूग्णांसाठी नेमण्यात येणारी क्षेत्रे आणि त्यांच्या हॉस्पिटलायझेशनवर चर्चा करण्यात आली.

corona update
Bachchu Kadu: बच्चू कडू मविआच्या वाटेवर? एकनाथ शिंदेंचं नाव घेत म्हणाले, 'मुख्यमंत्रीपदी शिंदे आहेत तोवर....'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com