Corona Update : कोरोना प्रादुर्भावाचा 70 लाखांचा टप्पा; गेल्या 24 तासात 73,272 नवे रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 October 2020

आज दिवसभरात हा आकडा 70 लाखांचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज आहे.

जगभरात 180 हून अधिक देश कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने त्रस्त आहेत. भारतातही दररोज कोरोनाग्रस्तांची संख्या ही वाढतच आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 69 लाखांचा टप्पा ओलांडून पुढे गेली आहे. आज दिवसभरात हा आकडा 70 लाखांचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज आहे. आरोग्य मंत्रालयाने आज शनिवारी सकाळी जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाबाधितांची संख्या 69,79,423 वर पोहोचली आहे. मागील 24 तासांत कोरोनाचे 73,272 नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत 82,753 रुग्ण कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झाले आहेत. यादरम्यानच, देशांत 926 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 59,88,822 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. 

हेही वाचा - महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद; श्रीकांत दातार 'हार्वर्ड बिझनेस स्कूल'चे नवे डीन
आतापर्यंत एकूण मृत कोरोना रुग्णांची संख्या 1,07,416 वर पोहोचली आहे. सध्या देशात 8,83,185 ऍक्टीव्ह केसेस आहेत. भारताच्या रिकव्हरी रेटचा विचार करायचा झाल्यास अगदी थोड्या सुधारणेसह तो 85.8 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोना पॉझिटिव्हीटी रेट हा 6.29 आहे. तर देशातील मृत्यूदर हा 1.53 टक्के आहे. 9 ओक्टोबर रोजी 11,64,018 कोरोनाच्या चाचण्या केल्या गेल्या. आतापर्यंत एकूण 8,57,98,698 नमुण्यांची चाचणी केली गेली आहे. जगभरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला तर अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक लागतो. अमेरिकेनंतर सर्वांत जास्त चाचण्या या भारतातच होत असून एकूण भारतीय लोकसंख्येचा विचार करता प्रति दहा लाख टेस्टच्या हिशेबाने ही संख्या आजही कमीच आहे. 

हेही वाचा - जवानांसाठी नॉन बुलेटप्रूफ ट्रक आणि मोदींसाठी 8400 कोटींचे विमान, राहुल गांधींचा निशाणा

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा
गुरुवारी 13 हजार 397 केसेस सापडले आहेत. काल 15 हजार 575 रुग्ण बरे झालेत आणि 358 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 14 लाख 93 हजार 884 रुग्ण सापडले आहेत. यामधील 12 लाख 12 हजार 16 रुग्ण बरे झाले आहेत. आता 2 लाख 14 हजार 986 रुग्णांवर उपचार सुरु आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 39 हजार 430 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona live update india to reach 70 lakh cases