Corona updates: देशात चाचण्यांची संख्या झाली कमी; एकूण रुग्ण 64 लाखांच्या जवळ

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 2 October 2020

देशात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असून तो आटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे. गेल्या 2-3 आठवड्यापासून देशात 80 ते 90 हजारांच्या दरम्यान रुग्ण वाढत आहेत.

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असून तो आटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे. गेल्या 2-3 आठवड्यापासून देशात 80 ते 90 हजारांच्या दरम्यान रुग्ण वाढत आहेत. मागील 24 तासांत देशात कोरोनाने 1 हजार 95 रुग्णांचा मृत्यू झाला असून 81 हजार 484 नवीन रुग्णांचं निदान झालं आहे. आतापर्यंत देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 63 लाख 94 हजार 69 झाला आहे. तर कोरोनाने मृत झालेल्यांचा आकडा 99 हजार 773 झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ( Ministry of Health & Family Welfare) दिली आहे. 

दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यंत कोरोनाचे 53 लाख 52 हजार 78 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या 9 लाख 42 हजार 217 रुग्ण उपचार घेत आहे. आता देशभरात ऑक्टोबर महिन्यात अनलॉक 5 सुरु केल्याने कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

देशात दररोज चाचण्यांची संख्याही कमी होत असल्याचे दिसत आहे. बुधवारी देशात 14 लाखांपेक्षा जास्त कोरोना चाचण्या झाल्या होत्या तर गुरुवारी 10 लाख 97 हजार 947 चाचण्या झाल्या आहेत. दोन दिवसांची तुलना केली तर कोरोना चाचण्यांत जवळपास 4 लाखांची घट दिसून आली आहे. मागील 24 तासांतील कोरोना चाचण्या धरून देशात आतापर्यंत 7 कोटी 67 लाख 17 हजार 728 चाचण्या झाल्या आहेत.

संपुर्ण देशात कोरोना रुग्णांची संख्या 63 लाखांच्या वर गेली आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाने 1,181 रुग्णांचा मृत्यू झाला असून 86 हजार 821 नवीन रुग्ण आढळले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनाने 98 हजार 678 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील 2 दिवसांत कोरोना रुग्णांची आकडेवारी 80 हजारांच्या खाली गेल्याने दिलासादायक स्थिती निर्माण झाली होती. पण मागील 24 तासांतील वाढ जवळपास 90 हजारांच्या जवळ गेल्याने चिंतेत वाढ झाली आहे. 

Hathras: भीतीपोटी पीडितेचे कुटुंबिय सोडणार गाव

देशातील कोरोनाची बाधा (COVID19) झालेल्यांचा आकडा 63 लाख 12 हजार 585 झाला आहे. सध्या देशात 9 लाख 40 हजार 705 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यंत 52 लाख 73 हजार 202 जण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare) दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona patients in india is near to 64 lakh