esakal | एका संशोधनानुसार अधिक घातक असू शकतं दुसऱ्यांदा पॉझिटीव्ह येणं
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

मेडिकल जर्नल 'क्लिनिकल इंफेक्सियस डिसीज'मध्ये प्रकाशित एका शोधनिबंधातून याबाबतची माहिती समोर आली आहे.

एका संशोधनानुसार अधिक घातक असू शकतं दुसऱ्यांदा पॉझिटीव्ह येणं

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जगभरात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट येईल या शक्यतेवर चर्चा रंगली आहे. तसंच एकदा कोरोना होऊन गेल्यानंतर तो दुसऱ्यांदाही होण्याबाबत अनेक माहिती समोर येत आहेत. आतापर्यंतच्या अभ्यासाअंती असा दावा केला गेला आहे की, दुसऱ्यांदा कोरोनाचे संक्रमण होणे, हे पहिल्यावेळेपेक्षा अधिक घातक असू शकते. 

लक्षणे नसलेल्या दोन व्हॉलेंटीअरवर हा अभ्यास केला गेला आहे, ज्यांना काही महिन्याच्या आतच दुसऱ्यांदा कोरोनाचे संक्रमण झाले आहे. दोन्ही व्यक्तींना दोन्ही वेळेला कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. या अभ्यासात त्यांच्या शरीरात आढळलेल्या व्हायरसच्या जेनेटीक संरचनेचा अभ्यास केला गेला. यातून आलेले निष्कर्ष हे धक्कादायक होते. 

हेही वाचा - बिहारचे माजी DGP गुप्तेश्वर पांडे उतरणार राजकारणात; सत्ताधाऱ्यांना देणार साथ

मेडिकल जर्नल 'क्लिनिकल इंफेक्सियस डिसीज'मध्ये प्रकाशित एका शोधनिबंधातून याबाबतची माहिती समोर आली आहे. एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या 25 वर्षीय पुरुष आणि 28 वर्षीय महिलेच्या नियमित तपासणीत 5 आणि 17 मे रोजी ते कोरोना संक्रमित निघाले. उपचारानंतर तेरा आणि 27 मेला दोघांचाही कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला. दोघांमध्ये कसल्याही प्रकारची लक्षणे नव्हती. यानंतर या दोघांची नियमित चाचणी पुन्हा एकदा झाली तेव्हा त्या तपासणीत ते पुन्हा एकदा कोरोना पॉझीटीव्ह आले होते. पुन्हा उपचारानंतर त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. 

या दोन्हीवेळच्या संक्रमणातील कोरोना व्हायरसचा अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं आहे की, पहिल्या संक्रमणाच्या तुलनेत दुसऱ्या वेळेला दोन्ही रुग्णांमध्ये व्हायरल लोड हा अधिक होता. 

हेही वाचा - Happy Birthday - भारताच्या अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह

व्हायरल लोड जितका अधिक असेल तितके आजारपणही घातक असण्याची शक्यता आहे. पहिल्या संक्रमणावेळी  एका रुग्णामधील व्हायरल लोड 89.08 टक्के होता तर दुसऱ्या वेळेला तो 99.96 टक्के झाला होता. तर दुसऱ्या रुग्णात हा लोड 85.60 वरुन 92.14 टक्क्यांवर गेला होता. यातील एका रुग्णामधील व्हायरसच्या जेनेटीक संरचनेमध्ये मोठा बदल देखील आढळलेला दिसून आला. 

व्हायरसला कमकूवत करणाऱ्या अँटीबॉडीजविरोधात व्हायरसमध्येच प्रतिकारशक्ती निर्माण होण्याची शक्यता याप्रकारच्या बदलांमुळे दिसून येत आहे. याचा अर्थ दुसऱ्यांदा संक्रमित होणं हे घातक आहे. असं असलं तरीही दोन्ही रुग्णांमध्ये लक्षणे मात्र दिसून आली नाहीत. कदाचित त्यांच्या चांगल्या  प्रतिकारशक्तीमुळे असं घडलं असावं, असा संशोधाकांचा कयास आहे. 

या संशोधनाचे प्रमुख संशोधक श्रीधर शिवाशुब्बू यांनी म्हटलं की या अभ्यासानुसार विनालक्षणांचे दुसऱ्यांदा संक्रमण होऊ शकते. मात्र, व्हायरल लोड अधिक असणंही चिंताजनक आहे. याप्रकारेच व्हायरसमध्ये जो अनुवंशिक बदल दिसून येत आहे, त्यावरदेखील संशोधन होणं गरजेचं आहे. 

loading image
go to top