esakal | पर्यटकांनो, राजस्थानला फिरायला जाणार आहात? वाचा महत्त्वाची बातमी

बोलून बातमी शोधा

Corona test mandatory for those going to Rajasthan From Maharashtra}

महाराष्ट्र आणि केरळमधून येणाऱ्या प्रवाशांना ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा अहवाल बंधनकारक करण्याचा निर्णय राजस्थान सरकारने घेतला आहे. देशात महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढती आहे.

पर्यटकांनो, राजस्थानला फिरायला जाणार आहात? वाचा महत्त्वाची बातमी
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्रातून राजस्थानला जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोनाच्या ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा अहवाल सक्तीचा करण्यात आला आहे. राजस्थानात पोचल्यावर तपासणीच्यावेळी ७२ तास पूर्वीचा हा अहवाल असणे बंधनकारक आहे.

महाराष्ट्र आणि केरळमधून येणाऱ्या प्रवाशांना ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा अहवाल बंधनकारक करण्याचा निर्णय राजस्थान सरकारने घेतला आहे. देशात महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढती आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राजस्थानात येणाऱ्या प्रवाशांचा आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असेल तरच त्याला प्रवेश देण्यात येणार आहे. रेल्वे आणि विमानप्रवाशांनाही हे बंधन असेल, असे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा - VIDEO : पंजाबचे CM कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासोबत थिरकले फारुक अब्दुल्ला; व्हिडीओची चर्चा


रेल्वे प्रवाशांनी आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल जवळ बाळगावा म्हणजे प्रवास करताना गैरसोय होणार नाही, असे आवाहन मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने केले आहे. दिल्लीमध्ये विमान आणि रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांनाही आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल बंधनकारक या पूर्वीच करण्यात आला आहे.

हेही वाचा - 'मेट्रो मॅन' श्रीधरन यांच्यावरुन केरळ भाजपात गोंधळ; मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीवरुन आता घुमजाव