फुंक मारल्यानंतर 40 सेकंदात समजेल कोरोना रिपोर्ट

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 October 2020

या किटचा उपयोग विमानतळ आणि इतर प्रमुख ठिकाणी केला जाईल. गुंतवणुकीच्या तुलनेत हे किट अत्यंत स्वस्त असेल. 

नवी दिल्ली- फुंक मारल्यानंतर 40 सेकंदात कोरोना आहे की नाही हे सांगणारे किट लवकरच येणार असल्याचा दावा इस्त्रायलचे भारतातील राजदूत यांनी केला आहे. एका मिनिटात चाचणीचा अहवाल देणारे हे किट भारत आणि इस्त्रायल संयुक्तरित्या विकसित करत आहे. 

इस्त्रायलचे राजदूत रॉन मल्का यांनी एका मुलाखतीत सांगितले की, कोरोनाची बाधा झाला की नाही हे तपासण्यासाठी व्यक्तीला एका ट्यूबमध्ये फुंकावे लागेल आणि 30 ते 50 सेकंदात त्याचा अहवाल येईल. हे रॅपिड किट अंतिम टप्प्यात आहे. यासाठी 2 ते 3 आठवड्यांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही. भारत या रॅपिड किटचे उत्पादन केंद्र बनले आहे. कोविड- 19 ला रोखण्यासाठी साथीच्या आजाराच्या प्रतिबंधासाठी लस विकसित करण्यास दोन्ही देश सहकार्य करतील, असेही ते म्हणाले.

हेही वाचा- Bihar Election : गळ्यात गळे आणि हातात हात चालणार नाहीत; बिहार प्रचार रॅलींसाठी नियमावली

याचदरम्यान, मल्का यांनी आपल्या हजारो नागरिकांना स्वदेशी पाठवण्यासाठी केलेल्या मदतीसाठी भारतीय अधिकाऱ्यांचे आभार मानले. आरोग्य क्षेत्रात इस्त्रायल आयुष्यमान भारताचे सीईओ इंदू भूषण यांच्याबरोबर काम करत असल्याचे सांगितले. 

हेही वाचा- गौतम नवलखा यांचे ISIसोबत संबंध; कोरेगाव भीमा प्रकरणात एनआयएचा दावा

राजदूतांनी सांगितले की हे नवीन रॅपिड किट महत्त्वपूर्ण आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानात भारत आणि इस्त्रायल यांच्यात अर्थपूर्ण सहकार्य कसे होऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे ते म्हणाले. या मोहिमेला 'खुले आकाश' असे नाव देण्यात आले आहे. या किटचा उपयोग विमानतळ आणि इतर प्रमुख ठिकाणी केला जाईल. गुंतवणुकीच्या तुलनेत हे किट अत्यंत स्वस्त असेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona testing in less than 30 seconds India-Israel soon launch rapid kit