esakal | कोरोनाचा कहर थांबेना! सलग तिसऱ्या दिवशी 2 लाखांहून अधिक रुग्ण; मृत्यूचा उच्चांक
sakal

बोलून बातमी शोधा

corona

कहर थांबेना! सलग तिसऱ्या दिवशी 2 लाखांहून अधिक रुग्ण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून सलग तिसऱ्या दिवशी दोन लाखांहून जास्त नवीन रुग्ण सापडले आहेत. पहिल्या लाटेतही देशात इतके रुग्ण सापडले नव्हते. गेल्या 24 तासात भारतात तब्बल 2 लाख 34 हजार 692 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात 1 लाख 23 हजार 354 रोग कोरोनामुक्त झाले. शुक्रवारी 1 हजार 341 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत एका दिवसात ही सर्वाधिक मृत्यू झाल्याची संख्या आहे. गेल्या वर्षी 15 सप्टेंबरला एका दिवसात सर्वाधिक 1290 मृत्यू झाले होते. याआधी गुरुवारीसुद्धा देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या 2 लाखांपेक्षा जास्त होती.

देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 कोटी 45 लाख 26 हजार 609 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 1 कोटी 26 लाख 71 हजार 220 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या ही 16 लाख 79 हजार 740 असून आतापर्यंत कोरोनामुळे 1 लाख 75 हजार 649 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. देशात लसीकरण मोहिम सुरु आहेत. आतापर्यंत जवळपास 13 लाख डोस देण्यात आले आहेत.

हेही वाचा: कोरोनाचा उद्रेक, कुंभमेळा प्रतिकात्मक घ्या; PM मोदींचे आवाहन

महाराष्ट्र, UP आणि दिल्लीत कोरोनाचा उद्रेक

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण असून काल दिवसभरात राज्यात 63 हजार नवीन रुग्ण सापडले. एका दिवसात आढळलेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 37 लाखांवर पोहोचला आहे. काल एका दिवसात राज्यात 398 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातही कोरोनाचा उद्रेक झाला असून राज्यात शुक्रवारी 27 हजार 426 नवीन रुग्ण सापडले. तर 103 जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशात सक्रीय रुग्णांची संख्या दीड लाखांवर पोहोचली आहे. दिल्लीतही मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण सापडत आहेत. दिवसभरात 19 हजारांहून अधिक रुग्ण सापडले. तर 141 जणांचा मृत्यू झाला. यामुळे दिल्लीत शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून वीकेंड कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

हेही वाचा: सावधान ! हवेतूनही होतोय कोरोनाचा संसर्ग

मृत्यूदर कमी

भारतात कोरोनाचा उद्रेक होताना दिसत असला तरी मृत्यू दर कमी आहे. देशातील रिकव्हरी रेट हा 88 टक्के असून सक्रीय रुग्णांचे प्रमाण वाढले असून ते 11 टक्क्यांवर पोहोचले आहे. सक्रीय रुग्णांच्या संख्येबाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगात अमेरिका, ब्राझील, मेक्सिको यानंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.

हेही वाचा: ऑक्‍सिजन पुरवठ्याबाबत पंतप्रधानांचा पुढाकार

लसीकरण मोहिम

देशात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली होती. तेव्हापासून 16 एप्रिलपर्यंत भारतातील 11 कोटी 99 लाख 37 हजार 641 जणांना डोस देण्यात आले आहेत. गेल्या तीस दिवसात 30 लाख 4 हजार 544 डोस दिले गेले. लशीचा दुसरा डोस देण्याची सुरुवात 13 फेब्रुवारीला झाली होती. तर एक एप्रिलपासून 45 वर्षांवरील व्यक्तींना डोस दिला जात आहे.