esakal | Corona Update : शुक्रवारी नवे 50,314 रुग्ण; एकूण मृतांचा आकडा 1.25 लाखांच्या पार 
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Update

काल देशांत जवळपास 50 हजार नवे रुग्ण सापडले आहेत.

Corona Update : शुक्रवारी नवे 50,314 रुग्ण; एकूण मृतांचा आकडा 1.25 लाखांच्या पार 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गेल्या आठ महिन्यांपासून कोरोना नावाच्या विषाणूने संपूर्ण जगभरातच हाहाकार माजवला आहे. संपूर्ण जग कोरोनाने त्रस्त आहे. अनेक युरोपिय देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. त्यामुळे त्या देशांत पुन्हा एकदा लॉकडाऊन लावला गेला आहे. भारतात देखील कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. या महिन्यांत असणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यामध्ये अजिबात ढिलाई केली जाऊ नये, यासाठी प्रशासानाकडून सातत्याने बजावले जात आहे. भारतातील आकडे कमी आले असले तरीही कोरोनाचा धोका अद्याप संपला नसल्याचे वास्तव आहे. 

हेही वाचा - कलम 370 परत आणल्याशिवाय मी मरणार नाही- फारुख अब्दुल्ला

कारण भारतात दररोज कोरोनाचे रुग्ण सापडत आहेतच. मात्र, दिलासादायक बाब अशी आहे की, रुग्णवाढीचा वेग मंदावला आहे. दररोज कोरोना रोगापासून बरे होणाऱ्या लोकांची संख्या ही नव्या संक्रमित लोकांच्या संख्येपक्षा जास्त आहेत. काल देशांत जवळपास 50 हजार नवे रुग्ण सापडले आहेत. देशात कोरोनाचा आकडा आता 83 लाखांच्या पार गेला आहे. आरोग्य मंत्रालयाद्वारे शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण रुग्णांची संख्या ही 84,61,771 झाली आहे. गेल्या 24 तासांत  50,314 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील कोरोना मृतांचा आकडा हा 1.25 लाखांच्या पार गेला आहे.

हेही वाचा - अमित शहा यांनी चुकीच्या प्रतिमेस पुष्पहार घातल्याने नवा वाद निर्माण
 
सध्या देशात 516632 इतके रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. तर आतापर्यंत एकूण 7819886 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. कोरोनाविरोधात यशस्वीरित्या लढण्यात ते यशस्वी ठरले आहेत. तर देशात आतापर्यंत 125562 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोविस तासांत 11,13,209 इतक्या टेस्ट  केल्या गेल्या आहेत. तर आतापर्यंत देशात 11,65,42,304 टेस्ट देशात केल्या गेल्या आहेत. 

loading image