Corona Update : सध्या भारतात 6,95,509 रुग्ण ऍक्टीव्ह; काल गुरुवारी 690 लोकांचा मृत्यू 

Corona Update
Corona Update

नवी दिल्ली : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण मानवजातीलाच वेठीला धरले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून जगभरात थैमान घालणाऱ्या या विषाणूमुळे आजवर लाखो लोकांचा जीव गेला आहे. भारतात कोरोनाचे आकडे सध्या कमी होत चालले असले तरीही कोरोना विषाणूचा धोका अद्याप कमी झाला नाहीये. जगभरात अनेक देशांत कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचं म्हटलं जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतात कमी झालेल्या आकड्यांनंतरही कोरोनाबाबतचे सर्व नियम कसोशिने पाळणे आवश्यक आहे. 

हेही वाचा - रेल्वेचा दसरा बोनस जाहीर; 11 लाख कामगारांना 78 दिवसांच्या पगाराएवढा बोनस
केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ही 77.61 लाखांच्या पार गेली आहे. मात्र, सध्या ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या 7 लाखाहून कमी झाली आहे. देशांत आतापर्यंत कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे 1,17,306 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत एकूण 77,61,312 कोरोना रुग्ण सापडले आहेत. सध्या भारतात 6,95,509 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. तर आतापर्यंत 69,48,497 लोक या संक्रमणातून सहिसलामत बरे झाले आहेत. 

भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 54,366 रुग्ण सापडले आहेत. तर काल गेल्या 24 तासांत 690 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 73,979 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. 22 ऑक्टोबरपर्यंत भारतात एकूण 10,01,13,085 सँपल टेस्ट केले गेले आहेत. यामधील 14,42,722 सँपल काल टेस्ट केले गेले आहेत. 

हेही वाचा - Bihar Election : प्रचाराची रणधुमाळी शिगेला; PM मोदींच्या तीन तर राहुल गांधीच्या दोन सभा
कोरोना विषाणूवरील प्रभावी लशीच्या निर्मितीसाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. भारतातदेखील यासंदर्भातील प्रयत्न जोमाने सुरु आहेत. मात्र आता या लशीच्या प्रकरणाने राजकारणात देखील एन्ट्री घेतली आहे. काल भाजपने बिहार निवडणुकीत जाहीर केलेल्या आपल्या जाहीरनाम्यात आम्हाला सत्ता परत दिली तर मोफत लस देण्यात येईल असं वचन दिलं आहे. यावर टीका होत आहे. लशीची वाट सर्वचजण पाहत आहेत मात्र, प्रभावी लस आल्यानंतरदेखील ती सर्व लोकांपर्यंत पोहचायला काही काळ जाऊ शकतो असं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं आहे. या येत्या नव्या वर्षाच्या सुरवातीला जरी लस आली तरीही ती ठणठणीत लोकांपर्यंत पोहोचायला 2022 साल उजाडेल, असं आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com