esakal | रेल्वेचा दसरा बोनस जाहीर; 11 लाख कामगारांना 78 दिवसांच्या पगाराएवढा बोनस
sakal

बोलून बातमी शोधा

railway bonus

बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव स्विकारण्यात आला.

रेल्वेचा दसरा बोनस जाहीर; 11 लाख कामगारांना 78 दिवसांच्या पगाराएवढा बोनस

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी आता खुशखबर आली आहे. रेल्वेच्या 11.58 लाख कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार आहे. अराजपत्रित म्हणजेच नॉन-गॅझेटेड रेल्वे कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्ष 2019-20 मधील 78 दिवसांच्या पगाराएवढा हा बोनस मिळणार आहे. याबाबतची माहिती रेल्वेने काल गुरुवारी जाहीर केली. यानुसार, रेल्वे कर्मचाऱ्यांना Productivity linked bonus (PLB) म्हणजेच उत्पादकतेवर आधारित एकूण बोनस हा 2081.68 कोटी रुपये असणार असल्याचा अंदाज आहे. 

परवा बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव स्विकारण्यात आला. रेल्वे मंत्रालयाच्या 2019-20 वित्तीय वर्षासाठी आपल्या सर्व पात्र असलेल्या नॉन-गॅझेटेड कर्मचाऱ्यांना हा 78 दिवसांच्या वेतनाएवढा बोनस देण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळाकडून स्विकारण्यात आला. यामध्ये आरपीएफ आणि आरपीएसएफ कर्मचाऱ्यांचा समावेश नाहीये. या बोनससाठी पात्र असलेल्या अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी वेतनाची आकलन सीमा 7 हजार रुपये प्रति महिना इतकी निश्चित करण्यात आली आहे.

हेही वाचा - Bihar Election : प्रचाराची रणधुमाळी शिगेला; PM मोदींच्या तीन तर राहुल गांधीच्या दोन सभा

काल गुरुवारी रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलेल्या निवेदनानुसार, रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना 78 दिवसांसाठी असा जास्तीतजास्त 17,951 रुपये इतका बोनस मिळू शकेल. या निर्णयामुळे रेल्वेच्या जवळपास 11.58 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. कोरोना काळात हा मोठा दिलासा मानला जात आहे. रेल्वेच्या उत्पादकतेवर आधारित बोनसमध्ये सर्व नॉन-गॅझेटेड कर्मचारी समाविष्ट आहेत ज्यात आरपीएफ आणि आरपीएसएफ कर्मचाऱ्यांचा समावेश नाही. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना दुर्गापूजा किंवा दसऱ्याच्या आधी हा पीएलबी बोनस मिळतो. या निर्णयामुळे आता रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना दसऱ्याच्या सुट्टीपूर्वी हा बोनस मिळणार आहे. 

हेही वाचा - Bihar Election : भाजपच्या मोफत लसीच्या आश्वासनावर चौफेर टीका; थरूर यांनी उडवली खिल्ली

कोविड-19 लॉकडाऊनच्या काळात रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी खूप कष्ट घेतले आहेत. श्रमिक रेल्वेच तसेच गरजेच्या वस्तूंची वाहतुक याबाबत कर्मचाऱ्यांनी कष्ट घेतले. जवळपास दोनशेहून अधिक अशा प्रोजक्टमध्ये सुरक्षिततेची खबरदारी घेऊन कर्मचाऱ्यांनी आपले काम केले आहे. या बोनसमुळे कर्मचारी आनंदीत होतात. त्यांना काम करण्यासा उत्साह येतो तसेच कामांत सुधारणा होते म्हणून हा  बोनस दिला जातो, असं रेल्वेने म्हटले आहे.