Corona Update : गेल्या 24 तासांत 78 रुग्णांचा मृत्यू; महाराष्ट्रात काल 2,216 नवे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 February 2021

याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे नवे 9,110 सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 1,08,47,304 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 14,016 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,05,48,521 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 78 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या 1,55,158 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात 1,43,625 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. भारतात आतापर्यंत 62,59,008 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

काल देशात 6,87,138 रुग्णांच्या चाचण्या केल्या गेल्या आहेत. या नव्या चाचण्यांसह देशातील आजवरच्या एकूण चाचण्यांची संख्या ही 6,87,138 पोहोचली आहे. याबाबतची माहिती Indian Council of Medical Research (ICMR) ने दिली आहे. 

महाराष्ट्रात काल 2,216 नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही 20,46,287 वर जाऊन पोहोचली आहे. काल राज्यात 3,423 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील एकूण आजवरच्या बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 19,58,971 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या राज्यात 34,720 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. राज्यात काल 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील एकूण कोरोना मृतांची संख्या ही 51,325 वर जाऊन पोहोचली आहे. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update India Daily Report 9 February 2021