Corona Update - देशात २४ तासात १ लाख ८० हजार रुग्ण; ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 4 हजारावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशात २४ तासात १ लाख ८० हजार रुग्ण; ओमिक्रॉनचे रुग्ण 4 हजार

देशातील कोरोनाच्या दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेटमध्ये वाढ होत चालली आहे.

देशात २४ तासात १ लाख ८० हजार रुग्ण; ओमिक्रॉनचे रुग्ण 4 हजार

देशातील कोरोनाच्या दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेटमध्ये वाढ होत चालली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असून रविवारी दिवसभरात १ लाख ७९ हजार ७२३ कोरोनाचे रुग्ण आढळले. तर २४ तासात १४६ जणांचा मृत्यू झाला. सध्या देशातील सक्रीय रुग्णांची संख्या ७ लाख २३ हजार ६१९ इतकी आहे. तर पॉझिटिव्हीटी रेट १३.२९ टक्के इतका झाला आहे.

कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉनच्या संसर्गाचा वेग जास्त आहे. त्याचेही रुग्ण देशात झपाट्यानं वाढत आहेत. देशात आतापर्यंत ओमिक्रॉनचे ४ हजार ३३ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक ओमिक्रॉन बाधितांची संख्या असून त्याखालोखाल दिल्ली आणि गुजरातमध्ये रुग्ण आहेत.

ओमिक्रॉनचा उद्रेक देशभरात वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी गृहमंत्री आणि आरोग्यमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. या बैठकीत पंतप्रधानांनी कोरोना प्रतिबंधक तयारीचा तपशील जाणून घेतला. जिल्हास्तरावर आरोग्य सुविधा पोहोचविण्यावर भर द्यावा, बालकांच्या लसीकरण वेगाने केले जावे अशा सूचना मोदींनी दिल्या आहेत. आजपासून देशात बूस्टर डोस (Precaution Dose) देण्यात येत आहे. तसंच ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटाला लसीकरण सुरु करण्यात आले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Coronavirusomicron
loading image
go to top