Corona Update : गेल्या 24 तासांत 55,342 नवे रुग्ण; 706 लोकांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 October 2020

18 ऑगस्टनंतर पहिल्यांदाच 55 हजारच्या आसपास नवे रुग्ण सापडले आहेत.

नवी दिल्ली : भारतात कोविड-19 चे 55,342 नवीन रुग्ण काल सापडले. काल सापडलेल्या नव्या संक्रमित रुग्णांसहित देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 71.75 लाखांच्या पुढे गेला आहे. यातील 62 लाखाहून अधिक लोक या व्हायरसपासून सहिसलामत मुक्त झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाद्वारे आज मंगळवारी सकाळी जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात  55,342 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांना धरुन देशात 71,75,880 इतकी कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे. 18 ऑगस्टनंतर पहिल्यांदाच 55 हजारच्या आसपास नवे रुग्ण सापडले आहेत. 18 ऑगस्ट रोजी 55,079 नवे रुग्ण सपाडले होते. 

हेही वाचा - 'मोबाईल रेडिएशन कमी करायचंय? गायीच्या शेणाची चीप वापरा'

 

काल देशभरात 706 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यानंतर कोरोनाबाधित मृतांची एकूण संख्या 1,09,856 झाली आहे. या साऱ्या परिस्थितीत आशादायक बाब अशी आहे की, पुन्हा एकदा संक्रमित होणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही जास्त आहे. गेल्या 24 तासात 77, 760 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात 62,27,295 लोक कोरोनाच्या तावडीतून सहिसलामत बरे झाले आहेत. देशात सध्या 8,38,729 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. यांच्यावर एकतर दवाखान्यात उपचार सुरु आहेत. किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे घरातच विलगीकरणात उपचार घेत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सांगण्यानुसार, देशातील कोरोनाचा रिकव्हरी रेट हा 86.78 टक्के झाला आहे. तर 11.68 टक्के रुग्ण ऍक्टीव्ह स्टेजमध्ये आहेत. कोरोनाचा मृत्यूदर हा 1.53 टक्क्यांवरच आहे तर आता पॉझिटीव्हीटी रेट 5.15 टक्क्यांवर घसरला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona update india registers 55342 new covid19 cases in 24 hours