Corona Update : दिलासादायक घसरण; रविवारी भारतात 11,858 रुग्णांना डिस्चार्ज

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 February 2021

ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

नवी दिल्ली : भारतात काल 11,427 नवे कोरोनाचे रुग्णा सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 1,07,57,610 वर जाऊन पोहोचली आहे. काल भारतात 11,858 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे.  या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,04,34,983 वर पोहोचली आहे. काल देशात 118 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 1,54,392 वर पोहोचली आहे. सध्या देशात 1,68,235 रुग्णा ऍक्टीव्ह आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

काल देशात 5,04,263 चाचण्या केल्या गेल्या. या नव्या चाचण्यांसह देशातील आजवरच्या एकूण चाचण्यांची संख्या ही 19,70,92,635 वर पोहोचली आहे. याबाबतची माहिती Indian Council of Medical Research (ICMR) ने दिली आहे. 

काल महाराष्ट्र राज्यात 2,585 कोरोनाचे रुग्णा सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही 20,26,399 वर पोहोचली आहे. काल राज्यात 1,670 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 19,29,005 वर पोहोचली आहे. राज्यात काल 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील एकूण मृतांची संख्या ही 51,082 वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या ही 45,071 वर पोहोचली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update India Report 1 February 2021