Corona Update : आरोग्य मंत्रालयाचे राज्यांना लसीकरणासंबंधात निर्देश; गेल्या 24 तासांत देशात 191 रुग्णांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 January 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 16 जानेवारीला देशव्यापी कोविड-19 लसीकरण अभियानाला सुरुवात करणार आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 16 जानेवारीला देशव्यापी कोविड-19 लसीकरण अभियानाला सुरुवात करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना लशीचे खुराक पाठवण्यात आले आहेत. हे जगातील सर्वात मोठे लसीकरण अभियान असणार आहे. केंद्र सरकारने कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचे एकूण 1.65 कोटी डोस खरेदी केले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना लसीकरणासंबंधात काही निर्देश दिले आहेत. 

भारतात गेल्या 24 तासांत नवे 15,590 रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील एकूण आजवरच्या कोरोना रुग्णांची संख्या ही 1,05,27,683 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 15,975 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णासह देशातील एकूण आजवरच्या बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,01,62,738 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत देशात 191 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील एकूण आजवरच्या मृतांची संख्या ही 1,51,918 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात 2,13,027 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 7,30,096 चाचण्या केल्या गेल्या आहेत. या नव्या चाचण्यांसह देशातील आजवरच्या एकूण चाचण्यांची संख्या ही 18,49,62,401 वर जाऊन पोहोचली आहे. याबाबतची माहिती Indian Council of Medical Research दिली आहे. 

हेही वाचा - Farmers Protest : चर्चेची 9 वी फेरी आज; राहुल गांधींच्या नेतृत्वात आज काँग्रेस रस्त्यावर

काल महाराष्ट्र राज्यात 3,579 रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 19,81,623 वर पोहोचला आहे. काल 3,309 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 18,77,588 वर जाऊन पोहोचली आहे. काल राज्यात 70 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील एकूण आजवरच्या मृतांची संख्या ही 50,291 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या राज्यात 52,558 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update India Report marathi 15 January 2021