esakal | Corona Update: लसीकरण वेगाने तरीही कोरोना हटेना; बरे होणाऱ्यांपेक्षा सक्रीय रुग्ण जास्त

बोलून बातमी शोधा

Corona }

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याचं दिसून आलं आहे. देशात गेल्या 24 तासांत 16 हजार 577 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

desh
Corona Update: लसीकरण वेगाने तरीही कोरोना हटेना; बरे होणाऱ्यांपेक्षा सक्रीय रुग्ण जास्त
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याचं दिसून आलं आहे. देशात गेल्या 24 तासांत 16 हजार 577 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 10 लाख 63 हजार 491 झाली आहे. गेल्या 24 तासांत 12 हजार 179 कोरोना रुग्णांनी विषाणूवर मात केली असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गुरुवारी 120 लोकांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. 

Share Market: जागतिक घडामोडींचा परिणाम! शेअर मार्केट सुरु होताच मोठी घसरण

आतापर्यंत देशातील 1 कोटी 7 लाख 50 हजार 680 लोकांनी कोरोना विषाणूवर यशस्वीपणे मात केली आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2 लाखांच्या खाली आहे. देशात सध्या 1,55,986  कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून बरे होणाऱ्यांपेक्षा सक्रीय रुग्णांची संख्या जास्त आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंत 1 लाख 56 लाख 825 लोकांचा बळी घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

भारतात कोरोना महामारीवर मात करण्यासाठी लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून सुरु झाली आहे. आतापर्यंत देशात 1 कोटी 34 लाख 72 हजार लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. याशिवाय भारताने आपल्या शेजारी राष्ट्रांनाही कोरोनाची लस देण्यास सुरुवात केली आहे. अनेक देशांना भारताने मोफतमध्ये कोरोनाची लस दिलीये. देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. विशेषत: महाराष्ट्रात गेल्या 5 दिवसांपासून 8 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. 

अमेरिकेचा सीरियावर एअरस्ट्राइक ते वेतन-पेन्शनवर सरकारी कर्मचाऱ्यांचा अधिकार,...

दरम्यान, देशात आतापर्यंत 11 कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. दुसरीकडे जगभरात 25 लाख लोकांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. कोरोना महामारीने अमेरिकेला सर्वाधिक पिडले आहे. देशात आतापर्यंत 5 लाखांपेक्षा अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या जगात 2 कोटींपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरु आहे. 8 कोटीपेक्षा अधिक लोकांनी कोरोनावर मात केली असून ते ठीक झाले आहे. असे असले तरी कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही.