
इराणसोबत अणु करारावर झालेल्या वादानंतर अमेरिकेनं इराणचा प्रभाव असलेल्या मिलिशियातील अनेक ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला आहे.
भारताने अनेक देशांना कोरोनाची लस मोफत दिली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. तर दुसरीकडे हिंदू महासभेच्या एका नेत्याला प्रवेश दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी दिसून येत आहे. तर सुप्रीम कोर्टाने कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसंबंधी महत्त्वाचा निर्णय दिला आहे. यासह महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा खालील लिंक्सवर..
दमिश्क - इराणसोबत अणु करारावर झालेल्या वादानंतर अमेरिकेनं इराणचा प्रभाव असलेल्या मिलिशियातील अनेक ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला आहे. सिरियातील मिलिशियाच्या ठिकाणांवर हवाई हल्ला करण्यात आला. वाचा सविस्तर
नवी दिल्ली- भारतात कोरोना महामारीवर मात करण्यासाठी लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून सुरु झाली आहे. अनेक देशांना भारताने मोफतमध्ये कोरोनाची लस दिलीये. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेरियेसेस यांनी भारताचे तोंडभरुन कौतुक केलंय. वाचा सविस्तर
भोपाळ - मध्य प्रदेशात ग्वाल्हेरच्या वॉर्ड नंबर 44 चे नगरसेवक असलेले हिंदू महासभेचे नेते बाबूलाल चौरासिया यांनी काँग्रेसप्रवेश केला. बाबूलाल चौरासिया हे त्या वॉर्डमधील नगरसेवक आहेत जिथं नथूराम गोडसेचं मंदिर उभारण्यात आलं होतं. वाचा सविस्तर
नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टाने कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसंबंधी महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सरकार कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन रोखू शकत नाही. तसेच पेन्शन आणि वेतन देण्यास उशीर होत असल्यास सरकारने त्यावर योग्य व्याज देणे आवश्यक आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे. वाचा सविस्तर
दहिवडी (जि. सातारा)- दोन कथित "देवऋषी'च्या भूत लागल्याच्या "सल्ल्याला' भुलून पालकांनी योग्य वैद्यकीय उपचार न केल्यामुळे एका चौदा वर्षीय मुलीचा हकनाक बळी गेल्याची खळबळजनक घटना येथे उघडकीस आली. वाचा सविस्तर
चेन्नई - तमिळनाडूतील इयत्ता नववी, दहावी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा द्यायची आवश्यकता भासणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी आज विधिमंडळामध्ये बोलताना केली. वाचा सविस्तर
पुणे - पीएमपीमधील ९ हजार ४९८ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने संचालक मंडळाच्या बैठकीत गुरुवारी दिली. वाचा सविस्तर
मुंबई- रिलायन्स ग्रुपचे प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जवळ मिळून आलेल्या संशयास्पद गाडीमध्ये वीस जिलेटिनच्या कांड्या सापडल्या. त्यानंतर मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाचा सविस्तर
नाशिक : सार्वजनिक ठिकाणी, घरगुती सोहळ्यांमधील गर्दीच्या वाढत्या उच्चांकामुळे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवजयंती कार्यक्रमांमधील सहभागानंतर बुधवारपासून (ता.२४) रुग्णांची संख्या वाढणार की घटणार, याचा ‘वॉच’ आरोग्य यंत्रणेतर्फे सुरू करण्यात आला होता. वाचा सविस्तर
नागपूर- डबा पकडण्याच्या घाईत महिला रेल्वेसोबतच धावू लागली. अचानक गाडी आणि फलाटादरम्यानच्या फटीतून ती रुळावर कोसळली. अपघाताने महिलेवर ओढवलेले जिवाचे संकट दोन्ही पायावर निभावले. वाचा सविस्तर
औरंगाबाद- मुलांचे खेळातील भांडण हे नेहमीचेच असते. भांडणार नाहीत ती मुले कसली? पण हे भांडण जीवावर बेतणारे ठरले तर मग तोंडचे पाणी पळते. अशीच घटना काही दिवसांपूर्वी परभणी जिल्ह्यात घडली. वाचा सविस्तर