Corona Update : देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या कोटींच्या पार; गेल्या 24 तासांत 222 रुग्णांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 January 2021

गेल्या 24 तासांत 9,37,590 कोरोनाच्या चाचण्या केल्या गेल्या आहेत.

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांत भारतात 20,346 रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील एकूण आजवरच्या रुग्णांची संख्या ही 1,03,95,278 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 19,587 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या रुग्णांसह देशातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,00,16,859 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 222 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील एकूण कोरोना मृतांची संख्या ही 1,50,336 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात 2,28,083 ऍक्टीव्ह रुग्ण आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

गेल्या 24 तासांत 9,37,590 कोरोनाच्या चाचण्या केल्या गेल्या आहेत. या नव्या चाचण्यांसह देशातील एकूण आजवरच्या कोरोना चाचण्यांची संख्या ही 17,84,00,995 वर जाऊन पोहोचली आहे. याबाबतची माहिती Indian Council of Medical Research ने दिली आहे. 

हेही वाचा - मोदी म्हणतात, वॉशिंग्टनमधील दंगल पाहून अस्वस्थ; लोकशाहीत शांतपणे सत्तेचे हस्तांतरण आवश्यक

महाराष्ट्र राज्यात काल 4,382 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच काल नवीन 2,570 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आजवर एकूण 18,52,759 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 50,808 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.79% झाले आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update India Update 7 January 2021