Corona Update : गेल्या 24 तासांत देशात 299 रुग्णांचा मृत्यू तर 26,139 रुग्ण बरे

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 December 2020

कोरोनाचा हा नवा स्ट्रेन नेहमीच्या कोरोना विषाणूपेक्षा 70 टक्के अधिक संसर्गजन्य आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाची स्थिती सध्यातरी खूपच दिलासादायक आहे. असं असलं तरीही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने भारतात शिरकाव केला आहे. या नव्या कोरोनाच्या स्ट्रेनने बाधित जवळपास 20 रुग्ण आढळून आले आहेत. नेहमीच्या कोरोना विषाणू पेक्षा हा नवा स्ट्रेन अधिक संसर्गजन्य असल्याने तीव्र वेगाने तो पसरतो.

गेल्या 24 तासांत भारतात 21,821 कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा 1,02,66,674 वर जाऊन पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 26,139 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या  98,60,280 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात कोरोनाचे 2,57,656 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. गेल्या 24 तासांत 299 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या आकडेवारीसह देशातील एकूण मृतांचा आकडा 1,48,738 वर जाऊन पोहोचला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

गेल्या 24 तासांत 11,27,244 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांसह देशातील आजवरच्या एकूण कोरोना चाचण्यांची संख्या ही 17,20,49,274 वर जाऊन पोहोचली आहे. याबाबतची माहिती Indian Council of Medical Research (ICMR) ने दिली आहे. 

काल महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे 3,537 नवे रुग्ण आढळून आले. या नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही  19,28,603 वर जाऊन पोहोचली आहे. काल राज्यात 4,913 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. राज्यात आतापर्यंत 18,24,934 रुग्ण कोरोनाशी लढा देऊन सहिसलामत घरी गेले आहे. सध्या राज्यात 53,066 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. राज्यात काल 70 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात एकूण 49,463 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

ब्रिटनमध्ये हा नवा स्ट्रेन सप्टेंबरमध्ये आढळला आहे, त्यामुळे कदाचित नोव्हेंबर महिन्यातच तो भारतात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाचा हा नवा स्ट्रेन नेहमीच्या कोरोना विषाणूपेक्षा 70 टक्के अधिक संसर्गजन्य आहे. अधिकृतरित्या हा नवा स्ट्रेन डिसेंबरमध्ये सापडला असला तरीही तो त्याआधीच भारतात आला असावा का याविषयी एएनआयशी बोलताना रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं की, अशी शक्यता नाकारता येत नाही कारण ब्रिटनमध्ये या नव्या स्ट्रेनमुळे बाधित रुग्ण सप्टेंबर महिन्यात आढळले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update marathi 31 december report