Corona Updates: रिकव्हरी रेट दिलासादायक, पण ब्रिटनमधील नवीन स्ट्रेनमुळे चिंतेत वाढ

Corona
Corona

नवी दिल्ली: देशात मागील 24 तासांत कोरोनाचे 24 हजार 712 नवीन रुग्णांचे निदान झाले असून 312 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांत कोरोनाचे 29 हजार 791 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) दिली आहे.

सध्या कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. पण ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे काही परिस्थिती चिंताजनक झाली आहे. याचाच परिणाम म्हणजे भारतात ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्यात आली आहे. देशात खबरदारी म्हणून काही राज्यांत संचारबंदीही लागू केली आहे.

भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 1 कोटींच्या वर गेला आहे. आतापर्यंत देशात 1 कोटी 1 लाख 23 हजार 778 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आकडेवारीत दिलासादायक बाब म्हणजे सक्रीय रुग्णांचा संख्या 3 लाखांची खाली जाऊन ती 2 लाख 83 हजार 849 झाली आहे.

देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत देशात 96 लाख 93 हजार 173 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे देशातील 1 लाख 46 हजार 756 जणांचा मृत्यू झाला आहे.

मागील आठवड्यात कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आल्यानंतर ब्रिटनमध्ये खळबळ उडाली होती. त्यात आता आणखी एक तिसरा प्रकार आढळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा विषाणू दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या लोकांच्या संपर्कात आलेल्यांमध्ये आढळून आला आहे. ब्रिट्रिश आरोग्य सचिव मॅट हँकॉक यांनी बुधवारी याची माहिती दिली. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्यांवर त्वरीत बंदी घातली जाणार आहे. 

ब्रिटनमध्ये व्हायरसचा तिसरा प्रकार
मागील आठवड्यात दक्षिण इंग्लंडमधील कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आला होता. हा विषाणू 70 टक्क्यांपेक्षा अधिक वेगाने पसरु शकतो. या विषाणूची माहिती समोर आल्यानंतर भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना स्थगिती देण्यात आली होती.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com