esakal | भारत बायोटेकच्या फेज 2 च्या चाचणीचे रिझल्ट जाहीर; किती काळ ठेवते सुरक्षित?
sakal

बोलून बातमी शोधा

COVID vaccin

भारत बायोटेकच्या स्वदेशी व्हॅक्सिनचे दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्सचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. हे व्हॅक्सिन सर्व वयोगटातील आणि महिला-पुरुषांवर एकसारखीच प्रभावी ठरले आहे.

भारत बायोटेकच्या फेज 2 च्या चाचणीचे रिझल्ट जाहीर; किती काळ ठेवते सुरक्षित?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - भारत बायोटेकच्या स्वदेशी व्हॅक्सिनचे दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्सचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. हे व्हॅक्सिन सर्व वयोगटातील आणि महिला-पुरुषांवर एकसारखीच प्रभावी ठरले आहे. सध्या व्हॅक्सिनची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. कंपनीने त्यांच्या व्हॅक्सिनसाठी ड्रग्ज रेग्युलेटरकडे आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी परवानगी मागितली आहे. 

एस्ट्राझेनका आणि ऑक्सफर्ड़च्या व्हॅक्सिनला डिसेंबर महिन्याच्या शेवटी आपत्कालीन मंजुरी मिळू शकते असं म्हटलं जात आहे. यासाठी ड्रग रेग्युलेटरच्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने डेटा मागितला होता. त्यावर भारतात व्हॅक्सिनची ट्रायल घेत असलेल्या सीरम इन्स्टीट्यूटने डेटा सूपूर्द केला आहे. असाच डेटा भारत बायोटेककडे त्यांच्या देशभरात सुरु असलेल्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या सुरुवातीच्या निरिक्षणाचा मागितला आहे. 

हे वाचा - भारतात ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनकाच्या व्हॅक्सिनला पुढच्या आठवड्यात मिळू शकते मंजुरी

दरम्यान, भारत बायोटेकनं बुधवारी कोव्हॅक्सिन म्हणजेच BBV152 च्या दुसऱ्या टप्प्यातील निकाल जाहीर केले आहेत. या व्हॅक्सिनमुळे बराच काळ शरीरात अँटीबॉडी आणि टी सेल्स मेमरी रिस्पॉन्स दिसून आल्याचं भारत बायोटेकनं सांगितलं.

पहिल्या टप्प्यात व्हॅक्सिन दिलेल्यांना दुसरा डोस दिल्यानंतर तीन महिन्यांनीसुद्धा व्हॅक्सिनचा प्रभाव होता. तर दुसऱ्या टप्प्यातील व्हॅक्सिनमुळे ह्युमरल आणि सेल मीडिएटेड इम्यून रिस्पॉन्स वाढलेला दिसला. कोव्हॅक्सिनमुळे वर्षभर कोरोनापासून व्यक्ती सुरक्षित राहू शकते असंही कंपनीने सांगितलं आहे. 

हे वाचा - कोरोनाची भीती नसलेला देश; कशाच्या जोरावर आहे बिनधास्त?

भारत बायोटेकनं डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली होती. यावर ड्रग रेग्युलेटरच्या कमिटीने बैठकही घेतली होती. यात भारत बायोटेकला सुरक्षेशी संबंधित अतिरिक्त माहिती जमा करण्यास सांगितलं होतं. तो डेटा दिल्यानंतरच वापरासाठी मंजुरी दिली जाईल असं म्हटलं होतं. आता परवानगीसाठी कंपनीला तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा डेटा द्यावा लागणार आहे. 

loading image
go to top