esakal | Corona Vaccination: लसीकरणाचे महत्त्व सांगणारे गुगलचे विशेष डूडल

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination: लसीकरणाचे महत्त्व सांगणारे गुगलचे विशेष डूडल
Corona Vaccination: लसीकरणाचे महत्त्व सांगणारे गुगलचे विशेष डूडल
sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: देशात सध्या कोरोनाने थैमान घालते आहे. मागील काही दिवसांपासून देशात रोज साडे तीन लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळत आहेत. सध्या वाढत्या रुग्णसंख्येवर कोरोना प्रतिबंधक लस घेणे हा एकच उपाय आहे. लस घेण्याला प्रेरित करण्यासाठीच आज गुगलने त्यांचं डूडल तयार केलं आहे.

आजचं गुगलचं डूडल हे लसीकरणाचे महत्त्व सांगणारे आहे. त्यासोबतच गूगलने कोरोनाला कसा अटकाव घालता येईल याबद्दलही सांगितले आहे. आज जेंव्हा तुम्ही गुगल उघडाल तेंव्हा ते होमपेज वेगळ्या स्वरुपात दिसून येईल. त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडले जाईल जिथं कोरोना लसीकरणाची माहिती मिळून जाईल.

हेही वाचा: आईच्या मृत्यूनंतर तीन वेळेस गेला जीव द्यायला!

या गुगल डूडलवर कर्सर ठेवल्यानंतर 'get vaccinated wear a mask save lives' अशा आशयाचे आवाहन दिसत आहे. सध्या कोरोनावर मास्क वापरणे, लसीकरण करून घेणे हे दोनच उपाय आहेत. सर्वांनी याचे पालन करावे तरच देशातील रुग्णसंख्या कमी होऊ शकते.

हेही वाचा: दोन्ही पाय तोडून शस्त्राने चिरला गळा; औरंगाबादमधील घटना

मागील २४ तासांत देशात कोरोनाचे ३.८६ लाख रुग्णांचे निदान झाले आहे. रोजचा कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. तर देशातील मृत्यूंची संख्या २ लाखांच्या वर गेली आहे. आजपासून देशात १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे लसीकरण सुरू होत आहे. सरकारने त्यासंबंधी नागरिकांना लसीकरणासाठी नोंदणी करण्याचेही आवाहन केले होते.