Covid_2019_20Coronav1
Covid_2019_20Coronav1

...तर कोरोना लस घेऊ नका; भारत बायोटेकने केलं सतर्क

नवी दिल्ली- कोरोनावर मात करण्यासाठी देशात लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. केंद्र सरकारने दोन लशींचा आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. यात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीचा समावेश आहे. भारत बायोटेकच्या लशीचे तिसऱ्या टप्प्यातील परिक्षण सुरु आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने काही निर्देश जारी करुन सावधानता बाळगण्यास सांगितलं आहे. 

कोवॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकने सविस्तर फॅक्ट शीट जारी करत म्हटलंय की, ज्यांची प्रतिकारशक्ती कमकूवत आहे किंवा ते असं औषध घेत आहेत, ज्याने प्रतिकारशक्तीवर प्रभाव पडू शकतो, त्यांनी कोविड-19 लस कोवॅक्सिन घेऊ नये. 

सरकारने याआधी कमी प्रतिकारशक्ती असलेले रुग्णही लस घेऊ शकतात असं सांगितलं होतं. सर्वसाधारणपणे किमोथेरेपी करत असलेले कँसर पेशेंट्स, एचआयव्ही पॉझिटिव्ह लोक आणि स्टेरॉईड घेणारे या प्रकारात मोडतात. अशा रुग्णांमध्ये संक्रमणाचा धोका सर्वाधिक असतो, पण डॉक्टरांचं म्हणणं आहे की या लोकांमध्ये लशीचा परिणाम कमी प्रमाणात होतो. 

आजारी, ताप, अॅलर्जी, गर्भवती अशा लोकांनीही काळजी घ्यावी

भारत बायोटेकने ब्लीडिंग डिसऑर्डर असणाऱ्या लोकांनी लस न घेण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय जे लोक गंभीर आजारी आहेत किंवा ज्यांना कसल्या प्रकारचा अॅलर्जीचा इतिहास आहे, गरोदर किंवा बाळांना दूध पाजणाऱ्या आई यांनीही लस घेऊ नये. लस घेणाऱ्याला जर कोरोनासंबंधी लक्षणं दिसून येत असतील, तर याला प्रतिकूल प्रभाव म्हणून नोंदलं जावं.  

देशभरात साधारण दुष्परिणाम दिसून आल्यानंतर फॅक्ट शीट जारी करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होऊ शकते, पण त्याचे संक्रमण साधारण असेल. भारत बायोटेकने म्हटलंय की कोवॅक्सिनचे गंभीर दुष्परिणाम दिसून येणे दुर्मिळ असणार आहे. गंभीर दुष्परिणामामध्ये श्वास घेण्यास अडचण, गळा सूजने, हृद्याचे ठोके वाढणे, शरीरावर चट्टे आणि अशक्तपणा याचा समावेश आहे.

फॅक्ट शीटमध्ये सांगण्यात आलंय की डॉक्टरांना किंवा वॅक्सिनेटरला आपल्या मेडिकल स्थिती विषयी नक्की सांगा. तसेच तुम्ही सातत्याने कोणती औषधं घेत आहात, तेही डॉक्टरांना सांगा. दरम्यान, कोवॅक्सिनचे तिसऱ्या टप्प्यातील परिक्षण सुरु आहे. त्यामुळे याचे अंतिम रिझल्ट हाती आलेले नाहीत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com