'असा' मास्क वापरा अन् चेहरा दाखवा...

corona virus bavens studio make protective mask photo viral
corona virus bavens studio make protective mask photo viral

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर त्याला रोखण्यासाठी मास्कची सक्ती करण्यात आली. पण, मास्कमुळे चेहरा दिसत नव्हता. पण, एक मास्क बाजारात आला असून, त्याला मोठी मागणी आहे.

केरळमधील कोची आणि कोट्टायम येथील बावेन्स स्टुडिओमध्ये हा मास्क तयार केला जात आहे. कलाविश्वातील कलाकार, इमोटिकॉन्स अशा इत्यादी गोष्टींचं परिक्षण केल्यानंतर बावेन्स स्टूडियोने त्यांची कल्पना सत्यात उतरवली आहे. बावेन्स स्टूडिओचा एक कर्मचारी म्हणाला की, 'आम्ही एक फोटो स्टुडिओ चालवितो. अनेक वर्षांपासून आम्ही याठिकाणी सब्लिमेशन प्रिंटिंग करत आहोत. ही अशी प्रिंटिंग आहे ज्याच्या माध्यमातून आपण पेन, टी-शर्ट, भेटवस्तू अशा अनेक वस्तूंवर आपल्याला हवी ती प्रिंट करू शकतो. त्यामुळे ग्राहकांची गरज लक्षात घेत बावेन्स स्टूडियोने आपला चेहरा समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येईल, असा मास्क तयार करण्यास सुरवात केली.'

सोशल मीडियाच्या माध्यमातून मास्कला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. देशभरातून या मास्कला मागणी आहे. या मास्कची किंमत पन्नास रूपये असून, एकादा वापरल्यानंतर स्वच्छ पाण्यात धुवून पुन्हा या मास्कचा वापर केला जावू शकतो. हा अनोखा मास्क तयार करण्यासाठी फक्त २० मिनिटांचा कालावधी लागतो, असे स्टुडिओच्या कर्मचाऱ्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com