भारतात कोरोनामुळे जास्त मृत्यू होणार नाहीत : तज्ञांचा अंदाज

वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

जगभरात कोरोना विषाणूंनी थैमान घातलेले असताना भारतात कोरोनामुळे जास्त मृत्यू होणार नसल्याचा अंदाज इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि एम्स रुग्णालयाचे इम्युनोलॉजीचे माजी प्रमुख डॉक्टर नरिंदर मेहरा यांनी व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली : जगभरात कोरोना विषाणूंनी थैमान घातलेले असताना भारतात कोरोनामुळे जास्त मृत्यू होणार नसल्याचा अंदाज इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि एम्स रुग्णालयाचे इम्युनोलॉजीचे माजी प्रमुख डॉक्टर नरिंदर मेहरा यांनी व्यक्त केला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे देशभरात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात करोना बाधितांची एकूण संख्या ६४९ आहे. त्यात ५९३ जण अजूनही करोना पॉझिटिव्ह आहेत. ४२ जण करोना मुक्त झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४ लाख ६० हजारांहून अधिक झाला आहे. तर मृतांची संख्या २० हजारहून अधिक झाली आहे. असं असताना भारतामध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सरकारने संपूर्ण देशच २१ दिवस लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला असून २५ मार्च ते १४ एप्रिल या काळामध्ये देशामध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढेल अशी भिती व्यक्त केली जात असताना मेहरा यांनी हा वेगळाच अंदाज व्यक्त केला आहे. देशातील करोनाग्रस्तांची संख्या वाढली तरी भारतामध्ये करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा वाढणार नाही असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

देशातील टोलवसुली बंद; गडकरींची घोषणा

भारतीयांची रोगप्रतिकारशक्ती सर्वाधिक
सर्वाधिक रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्या देशांमध्ये भारत अव्वल क्रमांकावर असल्याने आपल्या देशात कोरोनामुळे मृत्यांची संख्या वाढणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र प्रतिकारशक्तीच्या बाबतीत भारतीय जगभरातील इतर देशांच्या तुलनेत अव्वल असले तरी सरकारने आखून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यंत महत्वाचे असल्याचेही मेहरा यांनी सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona virus Death Rate In India Will Be Less Says Dr Narinder Mehra