कोरोना विषाणूमुळे केरळमधील पर्यटनाला फटका

Corona-Danger
Corona-Danger

तिरुअनंतपुरम - केरळ सरकारने कोरोना विषाणूला राज्य आपत्ती घोषित केल्यानंतर तेथील पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसू लागला असल्याचे दिसते आहे. 

देश-परदेशातील हजारो पर्यटकांनी केरळच्या हॉटेलमधील बुकिंग रद्द करायला सुरुवात केली आहे. आधी निपाह विषाणूनंतर आलेला महापूर आणि आता कोरोना विषाणूमुळे केरळची अर्थव्यवस्था पूर्णपणे झोपण्याची भीती वर्तविली जात आहे.

आताही पर्यटकांनी प्रामुख्याने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील केरळमधील हॉटेल बुकिंग रद्द केल्याची माहिती आज सरकारकडून विधिमंडळामध्ये प्रश्‍नोत्तराच्या तासामध्ये देण्यात आली. सुरुवातीला केवळ तिघांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची बाब समोर आली होती. यामध्ये तीन विद्यार्थी आणि एका महिला डॉक्‍टरचा समावेश आहे. हे सर्व चीनमधील वुहान विद्यापीठामध्ये शिकत होते. 

निपाहमुळे बदनामी
या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन सोमवारी राज्य सरकारने राज्य आपत्ती घोषित करण्याचा निर्णय घेतला होता. याआधीही निपाह विषाणूमुळे केरळची देशभर बदनामी झाली होती. आता हे नवे संकट आल्याचे पर्यटनमंत्री कडकमपल्ली सुरेंद्रन यांनी सांगितले.

आजारांबाबत सर्वांनीच सावध राहायला हवे. पण, त्याचा अर्थ असा होत नाही की त्याबाबत लोकांमध्ये भीती निर्माण केली जावी. माध्यमांनी या विषाणूबाबत लोकांमध्ये भीती निर्माण करू नये.
- कडकमपल्ली सुरेंद्रन, पर्यटनमंत्री, केरळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com