कोरोना व्हायरसमुळे बोधगयेतील पर्यटन व्यवसायाला फटका

उज्ज्वल कुमार
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

फेब्रुवारी ते मार्च पर्यटकांचा हंगाम

  • या काळात येतात सर्वाधिक पर्यटक
  • मठांच्या ऐवजी हॉटेलमध्ये राहण्यास प्राधान्य
  • टूर ऑपरेटर, हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका
  • विमानतळ, महाबोधी मंदिराजवळ कोरोनाच्या तपासणीची व्यवस्था

कोरोना व्हायरसमुळे दक्षिण-पूर्व आशियातील पर्यटकांनी रद्द केला दौरा
पाटणा - जगभरातील बौद्धधर्मीयांसाठी पवित्र ठिकाण असलेल्या बोधगयेतील पर्यटन व्यवसायाला कोरोना व्हायरसच्या फैलावाचा मोठा फटका बसला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बोधगयेसाठी पर्यटनाचा मुख्य हंगाम असलेल्या काळातच या विषाणूचा फैलाव झाला असून, कोरोनाच्या भीतीपोटी बोधगयेत येणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. 

दक्षिण-पूर्व आशियातील देशांतून बोधगयेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. कोरोनामुळे विदेशी पर्यटकांनी एक तर आपला दौरा रद्द केला आहे किंवा पुढे ढकलला आहे. त्याचा थेट परिणाम बोधगयेतील पर्यटनावर झाला आहे. चीन, तैवान, व्हिएतनाम, सिंगापूर, हाँगकाँग आदी देशांमधील पर्यटक आणि बौद्धधर्मीय नागरिक प्रामुख्याने बोधगयेला भेट देत असतात. या देशांना कोरोनाचा मोठा फटका बसल्यामुळे त्याचा परिणाम पर्यटकांच्या संख्येवर झाल्याचे दिसून येते.

पोलिस खात्यातील एकतर्फी प्रेमाचा करूण अंत; तरुणीची हत्या करून त्याची आत्महत्या

विदेशी पर्यटकांच्या अनेक मोठ्या गटांनी आपली यात्रा रद्द केल्यामुळे बोधगयेतील पर्यटन व्यवसायाला काही कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागते आहे.

हॉटेल व्यावसायिकांचे नुकसान 
कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे हाँगकाँग आणि सिंगापुरातील पर्यटकांच्या दोन गटांनी बोधगयेचा दौरा रद्द केला आहे, त्यामुळे माझे कमीतकमी दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. इतर ठिकाणच्या टूर ऑपरेटर्समार्फत येथे येणाऱ्या पर्यटकांनीही बोधगयेची भेट रद्द केल्याचे दिसत आहे. त्याचा फटका येथील हॉटेल व्यवसायालाही बसला आहे, अशी माहिती टूर आणि ट्रॅव्हल असोसिएशनचे अधिकारी सुरेश सिंह यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona virus hits tourist business in Bodhgaya