पोलिस खात्यातील एकतर्फी प्रेमाचा करूण अंत; तरुणीची हत्या करून त्याची आत्महत्या

टीम ई-सकाळ
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

दिल्लीतील रोहिणी परिसरातील मेट्रो स्टेशन वरून घरी जात असताना प्रिती अहलावत हिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

नवी दिल्ली : दिल्लीत पोलिस दलातील एकतर्फीप्रेमाचा दुदैवी शेवट झाला आहे. लग्नाचं प्रपोजल नाकारलेल्या पोलिस उपनिरीक्षक तरुणीचा गोळ्या झाडून खून करत, पोलिस निरीक्षकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात पोलिस तपास करत असून, सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय घडले?
या संदर्भात दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, दिल्लीतील रोहिणी परिसरातील मेट्रो स्टेशन वरून घरी जात असताना प्रिती अहलावत हिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. रात्री साडे नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रितीच्याच 2018च्या बॅचचा पोलिस उपनिरीक्षक दीपांशू राठी याने तिची हत्या केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे, दीपांशूने सोनीपत येथे मृथलमध्ये जाऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तेथे गाडीत दीपांशूचा मृतदेह सापडला आहे.

आणखी वाचा - पाकची पुन्हा कुर'घोडी'; 'आझाद काश्मीर'ला भारताचा आक्षेप

आणखी वाचा - दिल्लीत मतदान केंद्राबाहेर आप-काँग्रेस राडा

लग्नाचे प्रपोजल धुडकावले
दीपांशू आणि प्रिती एकाच पोलिस बॅचच होते. दीपांशू प्रितीवर प्रेम करत होता. त्याने तिला लग्नासाठी प्रपोजही केले होते. पण तिने नकार दिला. एकतर्फी प्रेमातून अस्वस्थ झालेल्या दीपांशूने काल टोकाचे पाऊल उचलले. दीपांशूनं केलेल्या गोळीबारात प्रितीचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिसांना तीन काडतुसं सापडली आहेत. तसेच पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत असल्याची माहिती पोलिस अधिकारी एसडी मिश्रा यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi police woman shot dead one sided love story