esakal | बँकॉक ते आयर्लंड; कोरोनाच्या लढ्यासाठी भारताला जगभरातून बळ

बोलून बातमी शोधा

बँकॉक ते आयर्लंड; कोरोनाच्या लढ्यासाठी भारताला जगभरातून बळ

कोरोनाच्या लढ्यात देशाला ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स यांची मदत जगातील इतर मित्र राष्ट्रांकडून केली जात आहे.

बँकॉक ते आयर्लंड; कोरोनाच्या लढ्यासाठी भारताला जगभरातून बळ
sakal_logo
By
टीम ई सकाळ

भारतात कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेला सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीत भारताला जगभरातून मदत केली जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून 40 देशांनी भारताला मदत केल्याचा दावा करण्यात आला आहे. कोरोनाच्या लढ्यात देशाला ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स यांची मदत जगातील इतर मित्र राष्ट्रांकडून केली जात आहे.

रोमानियाने 80 ऑक्सिजन कन्सेट्रेटर्स आणि 75 ऑक्सिजन सिलिंडर पाठवले आहेत.

हाँगकाँग - 300 ऑक्सिजन कन्सट्रेटर्स आणि इतर वैद्यकीय उपकरणे इंडिगो विमानाने दिल्लीत पोहोचली. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली.

हेही वाचा: चाळीस देश भारताच्या मदतीला; परराष्ट्र मंत्रालयाचा दावा

भारतीय हवाई दलाच्या C-17s ने 3 क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनर्स सिंगापूर ते पानगड (पश्चिम बंगाल) एअरलिफ्ट केले. तर 6 दुबईतून आणण्यात आले. याशिवाय बँकॉकहून 3 कंटेनर्स एअरलिफ्ट करण्यात आल्याचं भारतीय हवाई दलाने सांगितलं.

हेही वाचा: देशातील गर्भश्रीमंत मंडळींनी स्वतःच्या सुरक्षेसाठी केले सेफ्टी बबल्स तयार

आयर्लंडवरून 700 ऑक्सिजन कंन्सट्रेटर्स आणि 365 व्हेंटिलेटर्स भारतात पोहोचल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने देण्यात आली आहे.

अमेरिकेकडून येणारं साहित्य पुढच्या आठवड्यात पोहोचण्याची शक्यता आहे. अमेरिका ऑक्सिजन सपोर्ट, कन्सट्रेटर्स, ऑक्सिजन जनरेशन युनिट, पीपीई किट, रॅपीड डायग्नोस्टिक टेस्ट इत्यादी साहित्य पाठवत आहे.