esakal | व्हॅक्सिन तयार करणाऱ्या भारतीय कंपन्यांवर सायबर हल्ला; मायक्रोसॉफ्टच्या दाव्याने खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccin

भारतासह जगातील ७ प्रमुख कोरोना लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर सायबर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने याबाबत मोठी माहिती दिली आहे.

व्हॅक्सिन तयार करणाऱ्या भारतीय कंपन्यांवर सायबर हल्ला; मायक्रोसॉफ्टच्या दाव्याने खळबळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - भारतासह जगातील ७ प्रमुख कोरोना लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर सायबर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने याबाबत मोठी माहिती दिली आहे. या कंपन्यांमध्ये भारतासह कॅनडा, दक्षिण कोरिया,  फ्रान्स आणि अमेरिकेच्या प्रमुख फार्मास्युटिकल कंपन्यांचा समावेश आहे. यात काही कोरोना लसीवर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांचाही समावेश आहे. हा सायबर हल्ला रशिया आणि उत्तर कोरियामधून करण्यात आला असल्याचं मायक्रोसॉफ्टने म्हटलं असलं तरी हल्ला झालेल्या कोरोना लस निर्मिती कंपन्यांची नावं उघड केलेली नाही.  

भारतातील जवळपास ७ फार्मा कंपन्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लस विकसित करण्याचं काम करत आहे. या सर्व कंपन्यांचं नेतृत्व सीरम इंस्टीट्यूट आणि भारत बायोटेक करत आहेत. मायक्रोसॉफ्टने दिलेल्या माहितीनुसार, ज्या कंपन्यांना हॅकर्सने टार्गेट केलं आहे त्यातील बहुतांश कंपन्यांच्या कोरोना लसीची वैद्यकीय चाचणी सुरु आहे. रशियाचा स्ट्रोंटियम आणि उत्तर कोरियाचा झिंक, सेरिअम अशी सायबर हल्ला करणाऱ्या हॅकर्सची नावं आहेत.

हे वाचा - चांगली बातमी! कोरोना लस येण्याआधीच भारतीयांमध्ये प्रतिकारशक्ती

मायक्रोसॉफ्टने सायबर हल्ला झालेल्या लस उत्पादकांची नावे जाहीर केली नाहीत, तरी किमान सात भारतीय फार्मा कंपन्या सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांच्या नेतृत्वात कोरोना व्हायरस विरूद्ध लस तयार करण्याचे काम करत आहेत. हे असे हल्ले आहेत ज्यांचे प्रयत्न हजारो किंवा लाखो प्रयत्नांचा वापर करून नागरिकांच्या बँक खात्यात घुसून पैसे चोरले जातात.

हे वाचा - राष्ट्राध्यक्षांची सुरक्षा पाहणाऱ्या सीक्रेट सर्व्हिसमध्ये कोरोनाचा शिरकाव, 130 जणांना लागण

हल्लेखोरांनी नुकतीच संपूर्ण अमेरिकेतील रुग्णालये आणि आरोग्य सेवा संस्थांना लक्ष्य करण्यासाठी ransomware हल्ल्यांचा वापर केला. बर्ट म्हणाले, या हल्ल्यांमधील बहुतांश हल्ले आम्ही आमच्या तंत्रज्ञानाचा मदतीने रोखले आहेत. तसेच आम्ही संबंधित सर्व कंपन्यांना हल्ल्याबाबत माहिती दिली आहे.